तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 April 2020

मुंबई च्या लोकांचा कासारी गावात शीरकाव होताच रस्ता केला बंद




बीड (प्रतिनिधी) :-
      केज  तालुक्यातील कासारी येथे रात्री मुंबईहून सहा लोक असलेली गाडी कासारी गावात रात्री आली होती. गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना आज सकाळी ग्रामपंचायत च्या वतीने गावाकडे येणार आणि जाणारा मुख्य रस्ता बंद केला आहे,     सविस्तर माहिती अशी की, धारूर ते केज  मुख्य रस्त्यावर पोलीस असल्याने  कासारी गावातून चोरटी वाहतूक केली जाते. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या मुळे कासारी गावातील नागरिकांना त्रास होत असल्याने गावचा रस्ता बंद केला, रात्री आलेल्या मुंबईहून आलेल्या माणसाची चौकशी करत, त्यांना गावाबाहेर हाकलले, आप आपली काळजी घेत आपला गाव वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना कासारी  ग्रामपंचायतचे सरपंच सुखदेव वायबसे, शिवशाला वायबसे, ग्रामसेवक नागरगोजे, तलाठी रोडे  मॅडम. कासारी गावातील काही तरुणांना  ग्रामसुरक्षा दल स्थापन केले. आजपासून हे सर्व तरुण रात्रंदिवस गावची सुरक्षा करणार असून गावात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्या वर लक्ष ठेवून आहेत. गावातील लोक सोडता बाहेरचा एकही माणूस गावात येणार नाही याची दक्षता घेतली जात आहे, गावातील प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी गावाला सहकार्य करतो, धारूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक धस मॅडम यांचे देखील बारीक लक्ष आहे. गावातील प्रत्येक हालचालीवर, ग्रामपंचायत देखील लक्ष आहे, कासारी गावात फवारणी करत, गावातील सहाशे कुटुंबांना सनीटायझर च्या बाटल्या वाटल्या यावेळी गावचे उपसरपंच, उत्तम डोईफोडे, राजाभाऊ डोईफोडे, अण्णासाहेब वायबसे. रंजीत वायबसे, जयदेव  वायबसे. संदीप वायबसे, विकास हजारे, आदी ग्रामस्थ गावची काळजी घेत आहेत,

No comments:

Post a Comment