तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 10 April 2020

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ या योजनेतील लाभार्थ्यांनी बँकेत गर्दी करू नये, अफवावर विश्वास ठेऊन नये, प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे-निळंकठ चाटे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  कोरोना विषाणूमुळे नागरिक हैराण झाले आहेत. सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी यांच्या खात्यात मासिक मानधन जमा केले आहे. हे अनुदान उचलण्यासाठी बँकेत गर्दी करू नये, अफवावर विश्वास ठेऊन नये, प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन भाजयुमोचे युवा नेते निळंकठ चाटे यांनी केले आहे. 
          जगात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व त्याअनुषंगाने सुरू असलेले लॉकडाऊन यामुळे  दिव्यांग व्यक्तींना तसेच हातावर पोट असणारे, निराधार, रोजंदारी, कष्टकरी कामगार व गोरगरीब नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर संजय गांधी निराधार योजनेतील प्रत्येक लाभार्थींचे चार हजार रुपये व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना दोन हजार रुपये अनुदान खात्यात जमा केले आहे. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील निराधार, वृध्‍द, दिव्‍यांग, विधवा, घटस्‍फोटिता, परित्‍यक्‍ता आदी वंचित व दुर्बल घटकांना  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने जनता कर्फ्यू, जमावबंदी, संचारबंदी व देशभर लॉकडाऊन घोषित केले. याच पार्श्वभूमीवर दिव्यांग बाधंवांना अशा आपत्कालीन परिस्थिती खात्यात मानधन जमा झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. लाभार्थ्यांनी जमा झालेली रक्कम काढण्यासाठी बँकेचे मोठी गर्दी करू नये, खात्यात जमा झालेले पैसे परत जात नाहीत. त्यामुळे गडबड करू नये, बँका आजपासून तीन दिवस सुट्टी आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणाचेही पैसे परत जाणार नाहीत. कारण खातेधारकाच्या खात्यावर जमा झालेले पैसे इतर कोणालाही काढण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे तुमचे पैसे तुम्हालाच मिळतील, बँकेत गर्दीत करू नका, विनाकारण कुठल्याही प्रकारच्या गोष्टीवर विश्वास ठेऊ नका, केंद्र शासनाने जनता संचारबंदी, जमावबंदी व देशभर लॉकडाऊन घोषित केले हे लक्षात घेऊन घरातून बाहेर पडणे टाळा. कोरोनामुळे जगात थैमान घातले असुन लाभार्थ्यांनी आपले अनुदान उचलण्यासाठी बँकेच्या वेळेतच जावे, निराधार, दिव्यांग बाधवांनी घरातच बसा, गरज असेल तरच घराबाहेर पडा, गर्दी टाळा, बँकेत विनाकारण पैसे काढतांना गर्दी करू नये सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे तसेच प्रशासनाने दिलेल्या वेळोवेळी सुचनांचे पालन करावे असे आवाहन भाजयुमोचे युवा नेते निळंकठ चाटे यांनी केले आहे.

No comments:

Post a comment