तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 April 2020

कोरोणाच्या धर्तीवर 'आरोग्य सेतु'ठरतोय सर्वसामान्यांचा आधार(कोरोणा विषाणू संक्रमणाच्या लक्षणावरून घरीच करा टेस्ट)साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

संपूर्ण जगभरामध्ये कोरोना या संसर्ग  विषाणूजन्य रोगाने थैमान घातले आहे.एखाद्याला साधा ताप, सर्दी, खोकला, आला तरी कोरोना व्हायरसच्या तपाणीसाठी रुग्णालयात जावे लागते अशी भीती नागरिकांमध्ये जाणवू लागली आहे.परंतु या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य सेतू अँप अत्यंत महत्वपूर्ण ठरत आहे.
           सोशल डिस्टनसिंग व स्वच्छता हाच कोरोना मात करण्यासाठी एकमेव पर्याय असल्यामुळे त्याबाबत जागृती करणारे मार्गदर्शक ठरणारे केंद्रीय आरोग्य खात्याने तयार केलेले आरोग्य सेतू हे अँप सध्या अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे.
      आरोग्य सेतू या अँप'मुळे माहिती घरबसल्या मिळते शिवाय तुम्हाला स्वतःहून हॉस्पिटलला जाण्याची गरज नाही. कोरोना लक्षणाच्या संशय असलेले कोणीही या ॲपच्या वापर करून घरबसल्या माहिती घेऊन उपचारही घेऊ शकता येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना व्हायरस या साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यास मदत करण्याची रुची या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
     *अँपचे नेमके काय काम?*
    प्ले स्टोअर मधून डाउनलोड होऊ शकणाऱ्या या आरोग्य शेती ॲप'मध्ये सुरुवातीलाच संक्रमणाचा धोका कसा कमी करता येतो याची माहिती दिली आहे. ही माहिती अकरा भाषांमध्ये दिली आहे भाषा निवडल्यानंतर त्यामध्ये आपले नाव, वय, लिंग,आदी माहिती द्यावी लागते.त्यानंतर ताप श्वास घे घेण्यास त्रास असल्यास ती माहिती भरावी तसेच गेल्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे का? हे विचारले जाते आरोग्य सेतू आपला ब्लूटूथ आणि मोबाईल लोकेशन द्वारे कोविड 19 पोसिटीव्ह चाचणी घेऊ शकणाऱ्या एखाद्या व्यक्ती बरोबर सामाजिक आलेखाद्वारे आपला संवाद ट्रॅक करतो.
 ॲप स्थापित केल्यानंतर आपल्या स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथ आणि लोकेशन चालू करा त्यामुळे आपण कोविड 19 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आल्यास हे ॲप सतर्क करते तसेच एप्पल अट द्वारे विलगीकरण याविषयी सूचना आणि लक्षणे उत्पन्न झाल्यास काय करावे या विषयी मदत आणि माहिती देखील दिली जाते. कोविड-19 पॉझिटिव्ह चाचणी घेतलेल्या एखाद्या व्यक्ती बरोबर जर आपण रस्ता  ओलांडला असेल तर तशी माहितीही आपणास कळविले जाते. आरोग्य सेतू च्या मदतीने आपण स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे आणि मित्र परिवाराचे रक्षण करू शकतात.प्रतिक्रिया
आरोग्य सेतू ॲपद्वारे या ॲप मध्ये भरलेल्या माहितीनुसार एखाद्या मध्ये जर कोरोना पॉझिटिव्ह लक्षणे असतील तर त्याची तातडीने नोंद हे ॲप घेते या ॲपमध्ये जे हेल्पलाइन कमांड कंट्रोलला दिली जाते. त्यानंतर संबंधित व्यक्ती राहत असलेल्या परिसरात सामान्य रुग्णालयात त्याची माहिती संबंधित यांच्या घरी जाते आणि आवश्यकता भासल्यास रुग्णाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येते त्यामुळे सर्वानी आरोग्य सेतू हें अप सर्वांनी आपल्या मोबाईल मधे घ्यावे


वैद्यकीय अधिकारी श्री कदम साहेब  प्राथमिक आरोग्यकेंद्र साखरा असे आव्हान यांच्या कडून करण्यात आले आहें

No comments:

Post a comment