तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 April 2020

ठोंबरे गुरुजीचं लाॅकडाऊनच्या पार्श्वभुमीवर लाडक्या विद्यार्थ्यांना पञ
वाशिम(फुलचंद भगत)-कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वञ लाॅकडाउन असल्याने सर्व शाळांनाही सूट्य्या देन्यात आलेल्या आहेत.अशातच आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना पञरुपी संदेश शेलुबाजार येथील आदर्श शिक्षक सिध्दार्थ  ठोंबरे यांनी पाठवला आहे.

👇🏻
(पत्र मुलांनी आई व बाबा यांना वाचून दाखवावे.)

पत्रास कारण की,

प्रिय, 
       विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो,   
          विषय:- तुमची खूप आठवण येत असल्याकारणाने..                       

          मी मित्र मैत्रिणी म्हणालो, कारण दोन वर्षांच्या सहवासानंतर तेवढं आमचं नातं  पक्क नक्कीच झाल आहे. 17 मार्च पासून आपली भेट नाही. आता  तर 21 दिवस लॉकडाउन असल्याने तसेच पुढे आणखी वाढण्याची शक्यता असल्याने आपण भेटू शकत नाही.संवाद साधू शकत नाही. चर्चा करू शकत नाही. खेळू शकत नाही, पण तुम्ही मात्र भरपूर खेळा पण घरात बसूनचं बरं का.!.सापशीडी , कॅरम, काचा कवड्या , व्यापार तसेच बुद्धीबळ यांसारखे त्याचबरोबर, अजूनही नवीन खेळ आई बाबा कडून शिका.  शाळेत शिकलेली गाणी म्हणून दाखवा, गोष्टी सांगा वर्गातल्या आपण केलेल्या गमती-जमती  सांगा. तुमच्या आई बाबांनाही त्यांचे शाळेतले  अनुभव , गोष्टी तसेच त्यांच्या वेळी ते म्हणत असणाऱ्या गाणी कविता म्हणायला सांगा. गाण्याच्या, मुलांच्या नावाच्या, फुलांच्या गावांच्या नावाच्या भेंड्या लावा. 
     T. V. ही पहा पण थोडा वेळ . कारण किती दिवसांनी तुम्हाला आई आणि बाबांसोबत इतके दिवस सुट्टी मिळाली आहे. कार्टून सोबत  बातम्या ही बघत जा. देशात काय काय सुरू आहे ते समजेल, जर नाहीच काही समजलं तर मोठ्यांशी या विषयावर चर्चा करा. 

      आईला कामात मदत करा. एखादी छोटीशी वस्तू बनवायला शिका , किमान कशी करतात ते पहात चला, म्हणजे चहा पोहे असं. झाडू मारणे, कपड्याच्या घड्या घालणे, भांडी घासणे धुणे, फरशी  पुसणे या कामात आईला मदत करा , मग बघा किती खुश होते ती. आणि तुम्हाला ही कळेल की ती दिवसभर किती काम करते ते.
      आवडत्या विषयांवर चित्रे काढा, वेगवेगळ्या वस्तू बनवा, वर्गात शिकवलेली सोपे प्रयोग... योगासने करा, घरातील इतरांनाही शिकवा. आपण वर्गात  केलेले काही आठवत असेल तर ते ही करा. आपण घेतलेले छोटे छोटे खेळ खेळा. 
     
        शाळेच्या शेवटच्या दिवशी काहीतरी वेगळं करायचं असा विचार केला होता.  आठवणीत राहावं अस काहीतरी करणार होतो स्वतःच्या वर्गासाठी ...ही शाळा सोडून जाणारांसाठी..काही तरी सरप्राईज द्यायचं होत. पण नाही देता आलं, असो .  
        पण तरीही काहीच नियोजन न करता ही शाळेचा शेवटचा दिवस ही  मजेदारच होता. सद्या उद्भवलेल्या संकटांबद्दल आपण सगळ्यांनी खूप गप्पा मारल्या होत्या आणि वॉट्स गृपच्या माध्यमातून संपर्कात कसे राहणार तेही सांगितले.
       आपला या वर्षातील घटना क्रम  आठवणी रुपात जाणून घ्यायचा  होता आणि तुमच्या शाळेबद्दल च्या भावना सुद्धा आवर्जून जाणून घ्यायला मी खूप उत्सुक होतो.निरोप समारंभ नव्हे तर सदिच्छा समारंभ घ्यायचा होता पण korona मुळे ते शक्य झाले नाही म्हणून  हे पत्र लिहिले.
     पत्र खूपच मोठं झालं आहे, नेहमीच्या पत्रात जागा माहीत असते त्यामुळे तेवढंच लिहिलं जात पण या व्हाट्सएपच्या पत्राला मात्र खूपच जास्त जागा आहे, त्यामुळे कळलंच नाही खूप मोठं पत्र झालं ते.
       एकच अपेक्षा आहे हे पत्र तुम्ही तितक्याच तन्मयतेने वाचव आणि आपल्या पालकांना ही वाचायला द्यावं. स्वतःच्या हस्ताक्षरात मला सुद्धा असं पत्र लिहून पाठवावं...प्रयत्न नक्की करा.... असो। .!मस्त मज्जा करा, पण घरात बसून!!

                             

                                   आपलाच
                              सिद्धार्थ ठोंबरे
                       (वर्गशिक्षक वर्ग सातवा)
                जि. प.व. प्राथ. शाळा शेलुबाजार


संकलन
फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a Comment