तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 April 2020

प्रशासनाने नाकारले,शिवराज मिञमंडळाने स्विकारले,राजस्थानातील मजुरांना मदतीचा हातवाशिम(फुलचंद भगत)-मंगरूळपीर येथे दहा बारा मजुर कामानिमित्य आले होते परंतु लाॅकडाउनमुळे ते ईकडेच अडकुन पडले.हाताला काम नाही त्यामुळे ऊदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे आपल्या लेकराबाळांचे पोट कसे भरावे हा प्रश्न त्यांचेसमोर ऊभा राहला अशातच मदतीसाठी स्थानिक प्रशासनाला साकडे घातले परंतु प्रशासनाकडुन मदतीसाठी असमर्थता दर्शवली ही माहीती शिवराज मिञमंडळातील सदस्यांना समजताच त्यांनी त्या राजस्थानी मजुरीसाठी आलेल्या दहाबारा कुटुंबांना गहु दाळ तांदुळ आणी किराणाचे वाटप करुन मदतीचा हात दिला.परराज्यातील लाॅकडाऊनमध्ये अडकले मजुर जिल्ह्यामध्येही असु शकतात त्यामुळे अशांना ऊदरनिर्वासाठी मदत करणे गरजेचे आहे त्यामुळे वरिष्ठ प्रशासनाने याची दखल घेवुन इतर ठिकाणचे अडकलेले गरजु गरीब यांना अशा कठीण परिस्थीतीत आधार द्यावा हीच माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a comment