तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 12 April 2020

विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार.


डोणगांव :-१२

आज  कोरोना वायरस च्या पार्श्र्वभूमि वर जनते साठी आपल्या  जिव पर्वा नकरता आपले कर्तव्य चोख पने पारपाडत असलेले  सरकारी कर्मचारी,पोलीस विभाग या सर्वांचा सत्कार करावा असे आहवान महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे अध्यक्ष  श्री सत्यजीत दादा तांबे पाटिल यांनी दिले होते, तर  यांच्या  आहवानाला प्रतिसाद देत मेहकर विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने मेहकर विधानसभा अध्यक्ष यासीन कुरेशी अध्यक्ष  यांनी बुलडाणा जिल्ह्याची सरहद्द डोणगांव येथील  याकुबिया मदरस्या   समोर रोड वर आहो रात्र कर्तव्यावर असलेले पोलिस बांधव पोलीस  कॉन्सटेबल श गणेश संतोषराव देशमुख , पोलीस कॉन्स्टेबल  किशोर मलधारी बोरे ,  होमगार्ड  अजाबराव मारोती खंडारे,  जनार्धन पुंडलीक कांबळे, यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन  सत्कार करण्यात आला, या वेळी मेहकर विधामसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष यासीन कुरेशी, मदरसा चे संचालक हाफिज अब्दुल अज़ीज़ कुरेशी. नसीम मौलाना अब्दुल रहमान खान नदवी, हे उपस्थित होते.
जमील पठाण
8805381333 /8804935111

No comments:

Post a Comment