तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 April 2020

स्वयं शिक्षण प्रयोग या महिलांनी निर्माण केल्या घरी बसून व्यवसायाच्या नवीन संधीलातूर(प्रतिनिधी)

गाव तळीखेड तालुका निलंगा स्वयं शिक्षण प्रयोग च्या माध्यमातून 2019 पासून सखी अन्नसुरक्षा शेती चे काम शंभर अल्पभूधारक महिलांसोबत सुरू आहे. गाव पातळीवर संवाद सहाय्यक म्हणून सौ मीना भिम झेटटी काम करतात यामध्ये शाश्वत शेती अन्नसुरक्षा महिला सक्षमीकरण व्यवसाय उभारणी भाजीपाला लागवड चारा लागवड अजोला व हायड्रोपोनिक शासकीय योजना गरजू व गरीब महिलांना देणे. यामधून अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांची आर्थिक बचत झाली पाहिजे व घरी लागणारे अन्नधान्य व कडधान्य भाजीपाला शेतात विषमुक्त पद्धतीने घेऊन स्वतः खाल्ला पाहिजे व उरलेला बाजारात विक्री केला पाहिजे तसेच महिलांची शेतकरी म्हणून ओळख निर्माण झाली पाहिजे या धर्तीवर गावात शंभर अल्पभूधारक शेतकरी महिलांनी काम जोरात सुरू केले आहे.
कोरोनाव्हायरस चे महाभयानक संकट जगावर देशावर व महाराष्ट्रात तसेच लातूरमध्ये पोहोचले आहे. हा विषाणू संसर्ग जन्य आजार असल्यामुळे ग्रामीण भागात महिलांना भीती वाटत आहे कारण साथीच्या आजाराने पूर्वी माणसे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मृत्युमुखी पडत होती. तसेच मोठ्या शहरातून खेड्याकडे परत येत येणाऱ्या लोकांना एक प्रकारे सर्व महिला मिळून मदत करत आहेत यासंदर्भात संवाद सहाय्यक प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन याबद्दल जनजागृती करत आहे.
संकटातही विकासाची बीजे रोवलेली असतात असे म्हणतात ते खरंच आहे त्याचप्रमाणे मीना जटी यांना यांना मोबाईलवर व्हिडिओ मास्क शिवण्याची ट्रेनिंग भाग्यश्री महिला ग्रह उद्योग मधून मिळून देण्याचे काम स्वयं शिक्षण प्रयोग आंतर्गत स्वयं शिक्षण प्रयोग च्या टीमने दिले त्याचप्रमाणे गावातील महिलांना ही दिले आता गावातील दहा महिला प्रति महिला रोज दोनशे मास्क शिवत आहे त्यांना दररोजचे दोनशे रुपये रोजगार घरी बसल्या मिळत आहे यातून त्यांचे घर कुटुंब व त्यांच्या गरजा यातून या संकटाच्या काळात भागच आहेत

No comments:

Post a comment