तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 April 2020

हेळंब येथील रेशन दुकानदार तुपाशी तर शासनमान्य कार्डधारक उपाशी.


दुकानदारावर कडक कारवाई करण्याचे
 नामदेव होळंबेचे तहसिलदारांना निवेदन.
                                  
 परळी वैजनाथ  (प्रतिनिधी ) :- जगात कोरोनाचा धुमाकूळ घातला असतांना येथे मात्र गोरगरीबांचे रेशन धान्य काळ्या बाजारात नेण्याचा धुमाकूळ घातला आहे. शासनाने  दिलेले  धान्य  हेळंब येथील  स्वस्त धान्य दुकानदार  देत  नसल्याने  त्याच्यावर  कारवाई करण्यात यावी अशी मागणी नामदेव  होळंबे  यांनी एका  निवेदनाद्वारे  परळी  तहसीलदार  यांना  केली आहे. तसेच विद्यामान सरपंच व माजी सरपंच यांनी दुकानदाराला हताशी धरुन गोरगरीबांचे गहू, तांदूळ, तेल साखर यामध्ये अफरातफर करून माल लंपास केल्याचा आरोप देखील केला आहे.
     याबाबत  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हेळंब येथील  स्वस्त धान्य दुकानात  माझे  कार्ड आहे. परंतु  बी.पी.एल चे  माझे  कार्ड  असताना  दुकानदार  तुमचे  कार्ड  ए.पी.एल मध्ये आहे. तुम्हाला  राशन  मिळणार नाही असे म्हणून  राशन  देण्यास नकार दिला. 
             जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गमुळे चिंताग्रस्त आहेत. संपूर्ण देशात लाँकडाऊन व संचारबंदी आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस आता वाढत चालली आहे. हे आकडे  चिंताजनक आहेत. रोजगारासाठी कुठलेही साधन उपलब्ध नसल्याने गोरगरीब नागरिक, शेतमजुर, सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत.  अशा परिस्थितीत शासनाने नागरिकांना रेशन उपलब्ध करून दिले. या रेशन मध्ये काही लोक अफरातफर करत आहेत. हेळंब येथील विद्यमान सरपंच व माजी सरपंच यांनी दुकानदारला हाताशी धरून गोरगरीबांचे राशन खाल्ले आहे. 
 सरपंच व माजी सरपंच यांनी स्वस्त धान्य दुकानदार सिताराम लांडगे यांना हताशी धरून गोरगरीबांना धान्य पासून वंचित ठेवले आहे. संकटाच्या काळात गोरगरीबांच्या धान्याचा काळा बाजार करणाऱ्या दुकानदारवर व सरपंच व माजी सरपंच यांच्या कारवाई करावी व परवाना रद्द करावा अशी मागणी कार्ड धारकांनी केली आहे. शासनाने  सांगितले  असतानाही  राशन  न देणाऱ्या  सदर  दुकानदारांवर कारवाई करण्याची  मागणी नामदेव  होळंबे यांनी तहसिलदार यांच्या कडे एका लेखी निवेदनाव्दारे केली असुन या निवेदनावर सुधाकर होळंबे,शरद गिते,आनंद आंधळे,विष्णु लांडगे,अम्रत कांदे,मारूती गिते,निव्रती आंधळे,भिमराव आंधळे,रंजना होळंबे,
मधुसुधन होळंबे,गणपत होळंबे,भानुदास होळंबे यांच्या सह्या आहे.

No comments:

Post a comment