तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 April 2020

कोरोना व्हायरस,लाॅक डाऊन'मुळे फुलांच्या शेतीवर फिरला नांगर ; कोरोनामुळे उध्वस्त झालेल्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा


 परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
कोरोनाव्हायरस मुळे आज पूर्ण जग हैरान परेशान झाले आहे.कोरोना  व्हायरसचा फटका अनेक घटकांसह उद्योग नोकर यांनाही बसला आहे.  शेतकऱ्यांचे तर कंबरडेच मोडल्यागत झाले आहे. तालुक्यातील फूल उत्पादक शेतकरी तर पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.शेतीमध्ये सिंचनासाठी उपलब्ध असलेल्या विहिर,बोर यांना जे थोडेबहुत पाणी उपलब्ध असते त्या पाण्यावरच जेमतेम फुलांची शेती करून तालुक्यातील अनेक शेतकरी आपली उपजिविका करत होते.परंतु कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये यासाठी देशातील व राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी बंद केले आहेत.

अशा मंदिरात देवाला वाहण्यासाठी फुलांचा पुरवठा हे फूल उत्पादक शेतकरी करत असतात,परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवस्थानासह पंचक्रोशीतील जवळपास सर्वच मंदिरे आज गत एक महिन्यापासून पूर्णतः दर्शनासाठी बंद असल्याने व गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रम बंद केल्याने, जसे की लग्न,सार्वजनिक सण, उत्सव,सभा-सत्कार इत्यादी हे सर्वच बंद असल्याने व या सर्व उत्साहांना फुल उत्पादक शेतकरी यांची फुल विक्री,हार विक्री,सजावट इत्यादी बंद पडल्याने फूल उत्पादक शेतकरी पूर्णतः उध्वस्थ झाले आहेत.तसे तालुक्यातील जवळपास सर्वच फूल उत्पादक शेतकऱ्यांवर फुलांच्या शेतीवर नांगर फिरवण्याची वेळ येऊन,अनेकांनी यावर नांगर फिरवलेल्याचेही दिसत आहे.परळी तालुक्यातील पांगरी,कॅम्प व परिसरातील अनेक फूल उत्पादक शेतकरी असून त्यांच्याशी कोरोनाव्हायरस व लॉक डाऊन'मुळे फुलांच्या शेतीचे व उत्पन्नाचे काय हाल आहे,याविषयी जाणून घेतले असता पांगरी कॅम्प येथील फूल उत्पादक शेतकरी मधुकर रंगनाथ इंगळे व तुळशीदास रंगनाथ इंगळे या फूलं उत्पादक शेतकऱ्यांची प्रत्यक्ष फुल शेत मळ्यात जाऊन पत्रकार अनंत गित्ते यांनी भेट घेतली असता त्यांनी कोरोनाव्हायरस व लाॅक डाऊनमुळे फुल उत्पादक शेतकरी कसे पुर्णतः उध्वस्त झाले आहेत,याची वास्तविक परिस्थिती सांगितली.यावेळी मधुकर इंगळे म्हणाले की लाॅक डाऊन इतके दिवस लांबणीवर जाईल असे वाटले नव्हते.उन्हाळ्याच्या अशा या कडक परिस्थितीत ईतर शेत पिकाचे पाणी टाळून फुल शेतीस पाणी देत होतोत व फुल शेती वाचवत होतोत.परंतु आता लाॅक डाऊनचा कार्यकाळ वाढल्याने आम्ही दोघा भावांनी जवळपास अर्धा-अर्धा एकर फुलांच्या शेतीवर नांगर फिरविला असून राहिलेल्या फुल शेतीवरही नांगर फिरविणार आहोत.झालेल्या नुकसानीबाबत इंगळे बंधूंनी सांगितले की परळी येथे वैजनाथ ज्योतिर्लिंग,पंचक्रोशीत असलेले अनेक देवस्थाने,तसेच या वर्षी लग्नसराईही मोठ्या जोमात राहणार होती,त्याचबरोबर अनेक मोठे धार्मिक सण,उत्सव, लग्न, कार्यक्रम होणार होते.या सर्वांसाठी फुलांची मोठी मागणी असते,यासाठी आम्हाला यावर्षी चांगला भाव फुलांसाठी मिळणार होता.ऊन्हाळी शिजनमध्ये अष्टल (गलांडा)फुलांना २० ते २५ रू.प्रति किलो,गुलाब फुलांना प्रति नग दिड ते दोन रू.भाव मिळतो.ईतर फुलांनाही ऊन्हाळी सिझन मध्ये बर्यापैकी भाव मिळतो.साधारण १० गुंठ्यामध्ये फुलांची शेती केली तर ८ ते १० हजार रू.प्रतिमहीना उत्पन्न मिळते.  आणि फुलशेती हे दूध व्यवसायाप्रमाणे दैनिक नगदी पैसे मिळवून देणारे पिक आहे.यामुळे आमची फुलांच्या शेतीमधून मोठी आशा लागली होती. परंतु कोरोनाव्हायरस व लाॅकडाउनमुळे आमची घोर निराशा झाली असून फुलशेतीला पाणी कमी पडेल म्हणून आम्ही दुसरे उत्पन्नही घेण्याचे टाळले व यातूनच आमच्यावर मोठे संकट कोसळले आहे.आता फक्त सरकारच्या मदतीशिवाय पर्याय नाही,अशा प्रतिक्रिया कोरोनाव्हायरस व लाॅकडाउनमुळे फुलशेतीचे नुकसान झालेल्या मधुकर इंगळे व तुळसीदास इंगळे या बंधूंनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

परळी तालुक्यातील कोरोनाव्हायरस व लाॅकडाऊन मुळे अशा अनेक फूल उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पांगरी गावात मधुकर इंगळे तुळशीदास इंगळे बंडू अंबादास काटुळे,कुमार गुलाबराव काटुळे,देविदास सावजी काटुळे, रावण गुलाब काटुळे,संचक किसन खेत्रे,मारूती गोविंद खेत्रे,विश्वनाथ लक्ष्मण खेत्रे,नारायण किसन खेत्रे,गोपिनाथ रामभाऊ खेत्रे,व्यंकटी डिगांबर तिडके,ज्ञानोबा गंगाराम मुंडे,दत्तात्र्य गोविंद खेत्रे,विठ्ठल सोपान काटुळे,नवनाथ बंडू खेत्रे,कोंडिबा केरबा तिडके  यांच्यासह अनेक फुल उत्पादक शेतकरी पांगरी,कॅम्प व परिसरात असून आज कोरोनाव्हायरस व लॉक डाऊन मुळे अशा सर्व फुलं उत्पादक शेतकऱ्यांचे कधी न भरून निघणारे नुकसान झाले आहे.

अशा सर्व फूल उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत पंचनामे करून शासनाने फूल उत्पादक शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचे आहे.

No comments:

Post a comment