तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 24 April 2020

पालम तालूक्यातील डिग्रस बंधाऱ्याचे पाणी नांदेडला सोडू नका आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे याचे जिल्हाधिकाऱ्याना दिले निवेदन

आरूणा शर्मा
पालम  तालूक्यातील
डिग्रस बंधाऱ्यातून दहा दशलक्ष घनमीटरच्यावर पाणी सोडू नका
आ.डॉ.रत्नाकर गुट्टे  पंचेविस दशलक्ष घनमीटर पाणी सोडल्यास अनेक गावात पाणी टंचाईची शक्यता. बागायती पिकाची होणार मोठे नुकसान . तालुक्यातील डिग्रस उच्च पातळीच्या बंधाऱ्यातून सध्या 37 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून त्यापैकी नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी बंधाऱ्यात 25 दशलक्ष घनमीटर पाणी  साठा सोडण्याची  प्रशासनाने तयारी केली असून त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई व बागायती पिकाचे मोठे नुकसान होणार आहे.पालम पूर्णा तालुक्यातील बागायती पिकाच्या विचार करता विष्णुपुरी बंधाऱ्यात दहा दशलक्ष पाणी साठा सोडण्यात यावा अशी मागणी गंगाखेड मतदार संघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे
यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे डिग्रस बंधारा बऱ्यापैकी भरला होता त्यामुळे पालम व पूर्णा तालुक्यातील गोदा काठावरील गावातील
अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बागायती पिकाची लागवड केली आहे शेतकऱ्यांनी ऊस, केळी,भुईमूग आधी बागायती पिके घेतली आहेत सर्व बागायती पिके चांगल्या परिस्थितीत असताना जलसंपदा विभागाने डिग्रस बंधाऱ्यातून 37 दशलक्ष घनमीटर साठ्यापैकी  25 दशलक्ष घनमीटर पाणी साठा विष्णुपुरी प्रकल्पात सोडण्यासाठी जिल्हाधिकारी परभणी यांना पत्र दिले असून 26 एप्रिल रोजी पाणी सोडण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे डिग्रस बंधाऱ्यातून 25 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा सोडल्यास केवळ बंधाऱ्यात 12 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा राहणार आहे त्यामुळे गोदा काठावरील बागायती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे डिग्रस बंधाऱ्यातून अनेक गावात नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा केलेला आहे जर बंधाऱ्यातून 25 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा सोडल्यास बंधार्यात पाणी साठा तळाला जानार असुन त्यामुळे अनेक गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होणार आहे त्यामुळे डिग्रस बंधाऱ्यातून दहा दशलक्ष घनमीटरच पाणीसाठा सोडण्यात यावा व पालम पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी पुरेल याची प्रशासनाने दक्षता घ्यावी तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई होनार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी जिल्हाधिकारी परभणी व कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग नांदेड यांच्याकडे केली आहे निवेदनावर रासपाचे जिल्हाध्यक्ष ऑ.संदीप अळनुरे आ.रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे पालम पूर्णा तालुका प्रभारी माधवराव गायकवाड तालुका अध्यक्ष नारायण दुधाटे तालुका अध्यक्ष बाळासाहेब कुरे,चंद्रकांत पौळ, शिवराम पैके,तयरखा पठाण,भगवान शिरस्कर,बाळासाहेब कराळे,शामराव काळे ,चंद्रकांत गायकवाड, गंगाधर डुकरे,रामचंद्र काळे, माधवराव नळदुर्गे, महेश बाबर,गणेश दुधाटे, विनायक पोळ धनंजय कदम,पुरुषोत्तम लांडगे,भागवत किरडे,सदाशिव शिंदे, काशिनाथ कदम, राजेश देशमुख ,तुकाराम पोळ,गोपीनाथ शिंदे ,शिवाजीराव चांदणे,नवनाथ पोळ,पिर खा पठाण, शंकर वाघमारे,भारत डोणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

No comments:

Post a Comment