तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 April 2020

माझ्या ताटातील एक घास माझ्या गरीब बांधवांसाठी.....


समाजसेविका ज्योती ठाकरे यांच्या संकल्पनेतुन गरीबांना मदतीचा हात

वाशिम(फुलचंद भगत)-मंगरुळपीर येथील समाजसेविका ज्योती ठाकरे यांनी माझ्या ताटातील एक घास गरीब बांधवासाठी या संकल्पनेतुन सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गरजूंना मदतीचा एक हात देण्यात येत आहे त्यांच्या या गरीबांप्रती असलेल्या कार्यामुळे सर्वञ त्यांचे कौतुक होत आहे.
              मंगरुळपीर शहरातील विविध परिसरात राहणाऱ्या सुमारे २२५ कुटूंबांना प्रशासनाची पुर्वपरवानगी घेवुन व सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून अन्ननधान्याचे तसेच भाजीपाला वाटप करण्यात आले.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लागू असलेले लाॅकडाऊन ३० एप्रिल २०२० पर्यंत वाढवण्यात आले आहे. नागरीकांनी घरातुन बाहेर पडू नये, त्यांना लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तुंसाठी त्यांची धावपळ होऊ नये. या सर्व गोष्टींचा विचार करून गरजु गरिबांच्या घरोघरी जाऊन २२५ कुटूंबांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. घरात बसणार, कोरोनाला हरवणार असा संदेश व आपण लवकरच या संकटातून बाहेर पडू असा दिलासाही सर्व नागरिकांना समाजसेविका ज्योती ठाकरे यांच्याकडुन देण्यात आला.अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि याची आता कष्टकरी आणि हातावरती पोट असलेल्या जनतेला गरज आहे, त्यामुळे कोरोनाच्या या दुःखात एक सुखाचा घास मिळावा आणि त्यामुळे लोक थोड्याफार प्रमाणात बाहेर पडणार नाहीत म्हणून एक मदतीचा हात मी दिला आहे, असे समाजसेविका ज्योती ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपी/वाशिम
मो.9763007835/84593206

No comments:

Post a comment