तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 9 April 2020

बँकेत गर्दी करू नका; अफवांवर विश्वास ठेवू नका -उपविभागीय अधिकारी गणेश महाडीक


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च पासून संपूर्ण भारत बंदीमुळे व्यवहार, बाजारपेठा बंद असल्याने हातावर पोट असणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.यामुळे केंद्र सरकारच्या वतीने जनधन खात्यात तीन महिने दरमहा ५०० रुपये जमा करण्यात येत आहेत. पहिला हप्ता जमा झाल्याने पैसे काढण्यासाठी बँकेचे मोठी गर्दी होत आहे. संदर्भात पैसे परत जाणार अशा अफवा पसरल्याने गर्दी होत आहे. या अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणाचेही पैसे परत जाणार नाहीत. कारण खातेधारकाच्या खात्यावर जमा झालेले पैसे इतर कोणालाही काढण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे तुमचे पैसे तुम्हालाच मिळतील, बँकेत गर्दीत करू नका असे आवाहन प्रशासनाच्या वतीने परळीचे उपविभागीय अधिकारी गणेश महाडीक यांनी केले आहे.
कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर भारत बंदमुळे हातावर पोट असणाऱ्या सामान्य, गरिब नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. यामुळे केंद्र सरकारने जनधन खात्यात इथून पुढे तीन महिने प्रती महिना ५०० रुपये जनधन खात्यात जमा करण्यात येत आहेत. यातील पहिला हप्ता ५०० रुपये जमा करण्यात आले आहेत. यासंदर्भात सोशलमिडीयावर वेगवेगळ्या अफवा पसरवून हे जमा झालेले पैसे दोन दिवसात परत जाणार आहेत असे पसरविले जात आहे. या अफवांमुळे बँकेत पैसे काढण्यास मोठी गर्दी होत आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक यांनी जनधन खात्यात जमा झालेले पैसे परत जाणार नाहीत.गर्दी कमी झाल्यास सामाजिक अंतर पाळून बँकेतील पैसे काढावेत अफलावर विश्वास ठेवून गर्दी करु नये असे आवाहन केले आहे.

No comments:

Post a comment