तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 10 April 2020

नगरसेवक अनिल गावंडे यांचा असाही परोपकारपणा.....
निराधार व्यक्तीला दिला जेवणाचा डबा

गरीबांचा मसिहा म्हणून अनिल गावंडे यांची ओळख

वाशिम(फुलचंद भगत)-कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गोरगरिब निराधारांना अत्यंत हलाखीची परिस्थीती निर्माण झाली असुन अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद असल्याने खुप अडचनी निर्माण होत आहेत पण याही परिस्थीतीत गरीब गरजुंना आधार देणारे दाते असल्याने माणुसकी अजुनही जिवंत असल्याचे दिसते.असेच एक परोपकारी वृत्तीचे ऊदाहरण मंगरुळपीर येथे पाहावयास मिळाले.नेहमी सामाजीक कार्यामध्ये स्वतःला झोकुन देवुन गरीबांना आधार असलेल्या नगरसेवक अनिल गावंडे हे नित्यक्रमाने घोटा येथील आपल्या शेतात सकाळी जात असतांना त्यांना पोटी फाट्यावर एक व्यक्ती दिसला.त्याचे कपडे मळके आणी फाटलेले होते आणी तो व्यक्ती ऊन्हात उभा होता व मानसिक संतुलनही बरोबर नसल्याचे लक्षात आल्याने अनिल गावंडे यांनी आपली गाडी थांबवुन आस्थेने विचारपुस केली तसेच प्रवासी निवार्‍यामध्ये त्या व्यक्तीला बसवले व सोबत असलेला जेवणाचा डब्बा ऊघडुन त्या व्यक्तीला जेवणाचा डबा दिला आणी काही पैसेही दिले.पोटात अन्न गेल्याने त्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर जो आनंद पाहला तेच माझ्या जीवनाचे समाधान असल्याचे मत नगरसेवक अनिल गावंडे यांनी व्यक्त केले.खरच आजही अशा गरजु निराधारांना असा आधार देणारे व्यक्तीमत्व आहेत याविषयी लोक गावंडे यांचे कौतुक करीत असुन नेहमी गरीबांसाठी झटणारा मसिहा म्हणून आपल्या तालुक्याचे आधारस्तंभ आहेत असेही मत ऐकावयास मीळत आहे.सर्वांनी अशी पपोपकारी वृत्ती जोपासने गरजेचे असुन गरजुंचा आधार बनावे जेणेकरुन आपले दान सत्कारणी लागेल.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a Comment