तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 April 2020

अखेर शहरी भागातील विद्यार्थ्यांनाही शाळेतील शिल्लक तांदुळ वाटन्याचे आदेश धडकले


सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांच्या मागणीला यश

वाशिम-(फुलचंद भगत)-ग्रामीण शाळेप्रमाणेच शहरी भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना लाॅकडाऊनच्या पार्श्वभुमीवर शाळेत असलेले शिल्लक तांदुळ वाटावेत अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी प्रशासनाला दि.२ एप्रील रोजी केली होती अखेर या मागणीला यश आले असुन दि.१५ रोजीच्या आदेशानुसार शहरी भागातील शाळांमधील शिल्लक तांदुळ विद्यार्थ्यांना वाटप करा असे परिपञक काढन्यात आले आहे.हाच प्रश्न नगरसेवक अनील गावंडे यांनीही शिक्षण विभागाला विचारणा करुन शहरामधील विद्यार्थ्यांनाही शिल्लक पोषण आहाराचे तांदुळ वाटावेत यासाठी चर्चा केली होती.
          ग्रामिण शाळांतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा शिधा वाटणार असे शिक्षण विभागाने आदेश काढले होते त्यानुसार
मुलांना टप्प्या टप्प्याने बोलावून गर्दी न करता शाळांमध्ये शिधा वाटावा अशा सुचनाही देन्यात आल्या व काही शाळांमध्ये पोषण आहाराचा शिधाही वाटप सुरु करन्यात आला परंतु शिक्षण विभागाने फक्त ग्रामीण भागातील शाळांमधीलच विद्यार्थ्यांना या लाॅकडाउनमुळे अचानक शाळा बंद करन्याचे आदेश आल्याने ऊर्वरीत शिधा वाटप करन्याचे आदेश दिले आहेत.परंतु असे करत असतांना शहरी भागातील शाळेतील विद्यार्थ्यांशी दुजाभाव केल्याचे दिसले. त्यामुळे शहरी विद्यार्थी यापासुन वंचित राहले होते.मंगरुळपीरमध्ये ९ शासकीय न.प.च्या शाळा असुन या शाळांमध्ये जवळपास दोन हजारापर्यत विद्यार्थी दाखल आहेत.तसेच जि.प.च्याही शहरी भागात शाळा आहेत.असे असतांना त्यांचा हक्काच्या शालेय पोषण आहाराच्या शिध्यापासुन शिक्षण विभाग कसा काय वंचित ठेवत आहे हे न ऊलगडणारे कोडे निर्माण झाले होते.शहरी ग्रामिण असा दुजाभाव करणारा आदेशच कसा काढल्या जातो हा ही प्रश्न ऊपस्थीत होत होता.शालेय पोषण आहाराचे धान्य मुख्याध्यापकांनी आणी शाळा समितीमधील पदाधिकारी यांनी चोरले हे प्रकरण सर्वश्रृत अाहे त्यातच हा शिल्लक राहिलेल्या पोषण आहाराच्या धान्याची कशी विल्लेवाट लावतील की काही शासकीय बाबु आणी अधिकारी मिळुन घशात घालतील असा सवाल नगरसेवक अनील गावंडे यांनी ऊपस्थीत केला होता.सोशल डिस्टंन्स ठेवुन हा शिधा शहरी भागाच्या विद्यार्थ्यांनाही वाटावा जेणेकरुन गोरगरिब विद्यार्थ्यांच्या मुखात या लाॅकडाऊनमध्ये हक्काचा घास पडेल अशी मागणीही पालकवर्गातुन होत होती.लवकरच आम्ही लेखी पञ देवून शालेय पोषण आहाराचा शिधा वाटपाची परवानगी घेनार असल्याची माहीतीही न.प.च्या शिक्षण सभापतींनी  दिली होती.
शाळांना अचानक सुट्टी द्यावी लागल्यामुळे शाळांमध्ये साठलेला पोषण आहाराचा शिधा विद्यार्थ्यांना वाटून टाकण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून मुलांना टप्प्या टप्प्याने बोलावून गर्दी न करता शाळांमध्ये शिधा वाटावा, असे आदेश विभागाने मुख्याध्यापकांना दिले आहेत.
राज्यातील शाळा मार्चच्या दुसऱ्याच आठवडय़ात बंद कराव्या लागल्यामुळे विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळेनासा झाला. संचारबंदीमुळे आणि रोजगार मिळत नसल्यामुळे अनेक वस्त्या, खेडोपाडी दोन वेळच्या जेवणाचीही ददात आहे. त्याचवेळी अनेक शाळांमध्ये शिल्लक असलेला मार्च आणि एप्रिलचा शिधा सडण्याची भिती शिक्षकांनी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर शाळेतील कोरडा शिधा विद्यार्थ्यांना सम प्रमाणात वाटून टाकण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने दिले आहेत. तांदूळ, डाळ, मसाले, तेल, मीठ, जिरे, मोहरी अशा शिल्लक असलेल्या माल विद्यार्थ्यांना शाळेत बोलवून देण्यात येणार आहे. मुलांना वाटूनही काही धान्य उरत असल्यास ते परिसरातील वसतिगृहातील मुलांना देण्याच्या सूचना मुख्याध्यापकांनी दिल्या आहेत. मुख्याध्यापक, शाळा समिती, व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत वाटप करून त्याचा अहवाल द्यायचा आहे.
रोज एक वर्गातील विद्यार्थ्यांना बोलवावे. गर्दी टाळावी, विद्यार्थ्यांना अंतर ठेवून उभे करावे, वाटप झाल्यावर शिक्षकांनी लगेच घरी जावे, स्वच्छतेची काळजी घ्यावी, एखादा विद्यार्थी किंवा त्याचे पालक आजारी असल्याच त्याच्या घरी धान्य पोहोचवावे असेही मुख्याध्यापकांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.दि.२८ रोजी शिक्षण विभाग वाशिम यांचेकडुन आदेश पारित झाला असुन त्यानुसार ग्रामिण भागातील शाळांना शालेय पोषण आहाराचा ऊर्वरीत शिधा वाटन्याचे सबंधितांना सुचित केले आहे परंतु शहरी भागातील विद्यार्थ्यांना माञ वंचित ठेवुन त्यांच्या मुखातील घास हिरावन्याचाही पध्दतशिरपणे प्रयत्नही झाला असल्याची चर्चा पालकांमधुन होत होती.ग्रामिण शहरी असा भेदभाव न करता शहरी भागातील विद्यार्थ्यांनाही ऊर्वरीत पोषन आहाराचे धान्य नियमानुसार वाटप करावे अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी प्रशासनाकडे केली होती त्या मागणीला अखेर यश आले असुन आता शहरी भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मुखीही हक्काचा घास जाणार आहे.मंगरुळपीर येथील शहरी शाळांच्या विद्यार्थ्यांना ऊर्वरीत शाळेमधिल तांदुळ दि.१७ रोजी शासकिय निर्देशानुसार वाटप करन्यात येतील अशी माहीती मिळाली आहे.या मागणीला यश आल्याने विद्यार्थ्यासह पालकांनाही आनंद झाला आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a comment