तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 26 April 2020

सेनगांव(हिंगोली)येथील तोष्णीवाल महाविद्यालया मार्फत विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन(विश्वनाथ देशमुख सेनगावकर)

सेग/प्रतिनिधी दि.26 एप्रिल सध्या जगभरात कोरोना महामारीच्या संकटाने थैमान घातले असुन भारतात पुर्णत: लाॅकडाऊन करण्यात आले आहे.याचा फटका शिक्षण क्षेत्रात देखील बसला असुन बहुतांश ठिकाणी शिक्षणाचे आदान,प्रदान पुर्णत: बंद आहे.याचे भान ठेवत श्री गजानन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ब्रिजगोपाल तोष्णीवाल यांनी आपल्या संस्थेअंतर्गत येणा-या सर्व शैक्षणिक संकुलांना ऑनलाईन मार्गदर्शन करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
विद्यार्थी हे दैवत समजून तोष्णीवाल महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक Sheets,Classroom,Sites,Persentations,Demonstration,Videosand live,Discussien session हे Whatsapp,you tube,Facebook 200 m app अशा नव ईलेक्ट्राॅनिक्स माध्यमाव्दारे करत आहेत.आतापर्यंत 200 एम अॅपच्या माध्यमातून डाॅ. शंकर पजई यांनी 60 विद्यार्थ्यांशी "संत साहीत्य" या विषयावर मार्गदर्शन केले. डाॅ. राजाभाऊ नवगणकर "घसारा" या विषयावर,डाॅ. प्रविण तोतला "ग्रामिण मराठी साहीत्य" या विषयावर,प्रा.संजय फड यांनी संवाद साधला,युट्युबच्या माध्यमातून डाॅ. भगवान,डाॅ. दत्ता सावंत,प्रा.धनाजी पाटील यांनी संवाद साधला,प्रा तडस यांनी "उद्योजकता विकास" या विषयावर तर डाॅ. विकास शिंदे यांनी कोविड19 या मध्ये आतापर्यंत सात हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.बेसिक इन ईलेक्ट्राॅनिक्स सर्कीट्स या विषयावर डाॅ. राजेश जोशी यांनी ऑनलाईन सर्टीफिकेशन कोर्स घेतला ज्यामध्ये 105 विद्यार्थ्यां सहभागी झाले होते.200एम अॅप व्दारे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.यु.पी.सुपारे यांनी सुध्दा मार्गदर्शन केले.तोष्णीवाल महाविद्यालयाच्या व इतर सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गजानन शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन ब्रिजगोपाल तोष्णीवाल,महाविद्यालयाचे विकास समितीचे सदस्य रमण तोष्णीवाल,संस्था सचिव यु.एम.शेळके,प्राचार्य एम.जी.तळणीकर यांनी केले.

No comments:

Post a comment