तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 9 April 2020

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या


सोनपेठ (प्रतिनिधी) :- सासरच्या लोकांकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोनपेठ येथे घडली आहे. याप्रकरणी पती, सासू, नणंदेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       याप्रकरणी पोलीस सुत्रांकडून देण्यात आलेली माहिती अशी की, बोधेगाव येथील प्रियंका हिचा विवाह सोनपेठ येथील महावीर सोट याच्याशी झाला होता. दोन वर्षांपासून तिला पती महावीर सोट, सासू सुशिला सोट, नणंद शितल पांढरे, तिचा पती दत्ता पांढरे, मावस सासू किशाबाई बर्वे हे प्रियंकाला तुला काम येत नाही, तु निट वागत नाही असे म्हणत शारीरिक व मानसिक त्रास देत होते. घटनेच्या दिवशीही तिच्या डोक्यात काठी मारून जखमी केले होते. सतत होणाऱ्या मारहाणीला आणि छळाला कंटाळून प्रियंकाने दिनांक ६ एप्रिल रोजी ८ वाजेच्या नंतर घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
         याप्रकरणी मयत विवाहितेचे मामा कल्याण सोन्नर यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध ३०६, ४९८ (अ), ३२४, ३४ भादंवि नुसार सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a comment