तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 9 April 2020

परळीत संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काढला रूट मार्च

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  कोरोना उपयांतर्गत लॉक डाऊन, संचारबंदी च्या पार्श्वभूमीवर गुरुवारी अंबाजोगाई चे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रूट मार्च केला.यावेळी एस आर पी ची तुकडी, परळी शहर पोलीस निरीक्षक हेमंत कदम ,संभाजीनगर चे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार सहभागी झाले व पोलीस सहभागी झाले होते गुरुवारी सकाळी शहर पोलीस ठाण्यापासून पोलिसांचा हा रूट मार्च काढण्यात आला .शहर पोलीस स्टेशन ,राणी लक्ष्मीबाई टॉवर, उपजिल्हा रुग्णाल रोड, पद्मावती गल्ली, बरकत नगर, रोडे चौक , इटके कॉर्नर ,एक मिनार चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आझाद चौक ,मार्गे पोलीस स्टेशन पर्यंत हा रूट मार्च निघाला.

यामध्ये दोन पोलीस निरीक्षक, चार एपीआय ,एक पीएसआय ,राज्य राखीव दलाचे दोन पोलीस अधिकारी ,28 जवान ,परळी शहर व संभाजीनगर पोलीस ठाण्याचे 45 कर्मचारी ,11 होमगार्ड पोलिसांची सात वहाने होती .संचारबंदी लॉक डाऊन या पार्श्वभूमीवर गर्दी टाळावी व विनाकारण रस्त्यावरून फिरू नये यासाठी हा रूट मार्च पोलिसांनी केला अशी माहिती परळी शहर पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी दिली.

No comments:

Post a comment