तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 18 April 2020

उन्हाळी पिकासाठी जायकवाडीचे पाणी सोडा : आ. डॉ. राहुल पाटील यांची मागणी


परभणी :  प्रतिनिधी
जिल्हयात सघ्या उन्हाळी हंगामातील पीके उभी असून भूईमुग, ऊस इ. पिके मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या वाढलेल्या तापमानामुळे भूईमुग पिकासाठी पाण्याची गरज खूप असल्याचे आ.डॉ.राहुल पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला व जायकवाडी धरणाचे अधिक्षक अभियंता व प्रशासक शि.ना. भोलभट यांच्याशी संपर्क साधला असता अधिक्षक अभियंता यांनी २२ ते २३ एप्रिल दरम्यान गायकवाडी धरणातून उन्हाळी हंगामासाठी पाणी पाळी क्र. ०३ करिता पैठण डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहीती आ.डॉ. राहुल पाटील यांनी दिली. 
पैठण डावा कालवा किमी १२२ ते २०८ मध्ये तिसºया पाणीपाळी मुळे जवळपास १६००० हेक्टर मध्ये सिंचन होईल त्यामुळे या पाण्यामुळे परभणी जिल्हयातील डाव्या कालव्यावरील लाभधारकांना फायदा होईल व शेतकºयांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल

No comments:

Post a comment