तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 23 April 2020

भाजपा अल्पसंख्यांक कार्यकर्ते शेख उस्मान शेख गणी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन


संग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील पातुर्डा वार्ड नं २ मधील काझीपुरा येथील रहिवासी भाजपा कार्यकर्ते माजी ग्रा प सदस्य  शेख उसमान शेख गणी यांना छातीचा त्रास होत असल्याने डॉ म्हसाळ यांच्या श्रीराम किलीनिक खाजगी रुग्णालयात नातेवाईकांनी उपचारासाठी भरती केले होते  डॉ म्हसाळ यांनी तपासणी करून प्राथमिक उपचार केल्यानंतर अकोला ह्दयरोगतंज्ञ यांच्याकडे नेण्याचा सल्ला दिला परंतु रुग्णालयातच ह्दयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले मुत्यू समयी त्यांचे वय ६३ वर्ष होते  ते भाजप अल्पसंख्यांकाचे सक्रिय कार्यकर्ते होते आ डॉ संजय कुटे यांचे खंदे समर्थक होते केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी सह भाजपा नेत्यांसोबत घनीष्ठ संबंध होते
केंन्द्री मंत्री नितिन गडकरी तालुक्यात भाजपा पक्ष संघटन साठी आले असता पातुर्डा फाटा येथे भाजपा शाखा अनावर प्रसंगी सत्कार कार्यक्रमास शेख उसमान  जातीने हजर होते त्यांच्यावर स्थानीक मुसलीम कब्रस्तान मध्ये मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थीत जनाजा नमाज व  दफन विधी करण्यात आले  त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले , २ मुली , २ भाऊ , ३ बहिणी आप्त परिवार आहे
भाजपा पदाधिकारी कडून शेख उसमान यांना श्रध्दांजली देण्यात आली
कोरोनाच्या पाश्वभुमिवर आरोग्य विभाग शासनाच्या नियमा नुसार सोशल डिस्टंशन प्रमाणे भाजप पक्षाच्या वतीने श्रंध्दांजली अर्पण करण्यात आली यावेळी माजी पं स सदस्य लोकेश राठी , रमनसेवक , भारत वाघ कृष्णा राहाटे, रामदास म्हसाळ , अविनाश धर्माळ,  भगवान राठी, शंककर बोपले , आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थीत होते

No comments:

Post a Comment