तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 25 April 2020

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतिने आरेगांव येथे मास्क वाटपडोणगांव :-

आज राज्यातच नव्हे तर देशात  कोरोनाव्हायरसने थैमान घातलेले आहे. सगळीकडे लाॕकडाऊन मुळे परीस्थीती वेगळीच  असल्यामुळे काही नागरींकाना अत्यावश्यक सेवेसाठी,कामासाठी बाहेर निघावे लागते म्हणुन गावातुन बाहेर जाणाऱ्या व्यक्ती साठी त्याला व त्यांच्या कुंटुबांच्या दृष्टीने सदर कोरोनाच्या संक्रमण होण्याची श्यकता नाकारता येत नाही आशा प्रसंगी फार काळजी घेणे गरजेचे आहे म्हणुन आज सामाजिक जानिवेतुन व मानवतेच्या दृष्टिकोनातून नागरींकाच्या आरोग्यासाठी व कोरोना आजार संपुष्टात आणण्यासाठी आज ब-याच गोर गरीब नागरींकाना  शिव क्लिनिक बस स्टॕंड आरेगांव येथे व गावामध्ये स्वाभिमानी चे जिल्हाअध्यक्ष यांनी  पुढाकार घेत मास्क तयार करुन घेतले होते  त्यांचे वाटप आज  पदाधिकारी व कार्यकर्त्ते यांच्याहस्ते यावेळी करण्यात आले. तसेच नागरींकानी नियमितपणे सदर मास्क वापरावा तसेच सामाजिक अंतर पाळावे व प्रशासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.आणी अति महत्त्वाचे कामासाठीच बाहेर पडावे अन्यथा घराच्या बाहेर पडु नये असे आवाहन केले.यावेळी स्वाभिमानी चे जिल्हाअध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टाले,सचिन मेंटागळे,विष्णु धांडे,विजय आंंधळे,गौतम सदावर्ते,महेबुबाभाई,फारुख खाॕ.पठान,अनिल सदावर्ते सह पदाधिकारी व कार्यकर्त्ते हजर होते यावेळी सर्वांनीच सोशल डिस्टंन्सिगचे पालन करुन मास्क वाटप केले. आणि यापुढे सुद्धा आरेगांवच्या संबंध नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी अशाच स्वरूपात मास्क तयार करून सर्व गोरगरीब नागरिकांना वाटने सुरूच राहील  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष यांनी गावातील सधन व सामाजिक कार्यकर्त्ते यांना आव्हान केले की या अशा आलेल्या दुर्दैवी प्रसंगावर मात करण्याकरिता आपला सुद्धा मोलाचा सहभाग असावा व आपणही सुद्धा मास्क तयार करून गरजूना व गोरगरीब नागरिकांना वाटप करावे सर्वांच्या योगदानाने कोरोना विषाणूंवर मात करता येइल.जमील पठाण
8805381333

No comments:

Post a Comment