तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 8 April 2020

कोरोनाचा सामान्य जनतेशी क्रिकेट सामना


       
                  मुळचा चायनीज प्लेअर कोरोना व्हायरस  ( कोविड-१९ ) हा अल्पवधीतच सर्व जगभर प्रसिद्ध  ( कुप्रसिद्ध) झाला.  उघडया डोळ्यांनीही न दिसणाऱ्या या खेळाडूने जगभरातल्या तमाम सरकारांना कामाला लावून अब्जावधी जनतेला नजरकैदेत ठेवलं. असंख्य लोकांना आपल्या विळख्यात घेतले. तर ६० हजाराहून अधिक बळी याने ३ महिन्याच्या आपल्या अल्पशा कारकिर्दीत घेतले. कोरोना या महाभयंकर खेळाडूचा सामना कोणा एकाशी नाही तर प्रत्येक सजिवाशी आहे. 
               वयाची, जातीची, वंशाची, खानदानीची देशाची, कोणतीही खेळाडू (व्यक्ती ) या कोरोनारूपी आँधीशी सामना करण्यास असमर्थ ठरत असताना प्रत्येक देशांच्या सरकारने कोरोना नावाच्या खतरनाक खेळाडूला रोखण्यासाठी आपापल्या देशांच्या सिमा सिलबंद करून टाकल्यात. त्याचा मज्जाव करण्यासाठी हवाई, समुद्री, रस्ता, या सर्व मार्गांची नाकाबंदी केली. चप्प्या चप्प्याला पोलिस, लष्कर, ठेवले. याच्यापासून सरंक्षणासाठी मास्क, सॅनीटायझर, स्पेशल सुट तयार केले तरीही याचे आक्रमण रोखण्याची कोणतीही हमी नाही.
              अगदी अल्पवधीतच सर्वांचा कर्दनकाळ ठरलेला कोरोना एखादया विपक्षी खेळाडूच्या  ( सामान्य नागरीक / माणूस ) संपर्कात गेला तर त्या माणसाचा बळी घेतल्याशिवाय राहात नाही. सर्वसामान्य खेळाडूंना कोरोना रुपी न दिसणाऱ्या खेळाडू जवळ वेगवेगळया प्रकारे स्विंग होणारे चेंडू आहेत, तर सामान्य खेळाडू ( माणूस ) ला नाचायला लावणारे स्पिनर्स आहेत. चांगल्या चांगल्यांच्या पायात पाय गुंतवणारे खतरनाक यॉर्करही आहे. मध्येच दणकण एखादा बाऊंसर टाकण्याची क्षमताही आहे. अचानक एखादा गुगली टाकण्याचे कसबही त्याला अवगत आहे. यष्टीच्या मागे तो टपून फलंदाजाला ( सामान्य माणसाला ) यष्टीचीत करण्याची विद्युत वेगाची नजाकतही त्याच्या जवळ आहे. मैदानात चोरट्या धावा घेणाऱ्या फलंदाजाला ( नियम -झुगारून,चोरून घराबाहेर पडणाऱ्या सामान्य माणसाला ) धावचित करण्याची जराशीही संधी तो दवडत नाही.
                 सामान्याच्या अक्षरशः जीवावर उठलेल्या या कोरोनाला आपला बळी घेण्यापासून वाचण्यासाठी प्रत्येकाने आपल्या क्रिझमध्येच ( घरात ) राहूनच हूल दयावी. आपली लक्ष्मणरेषा ओलांडायची नाही. सर्व सुरक्षा कवचांचा वापर करायचा. आपली टिम (जनसमुदाय ) एका ठिकाणी जमा होऊ द्यायचा नाही. कोरोनाला टाळण्यासाठी सेलेब्रेशनही टाळायचे. सरकाररूपी  क्रिकेट बोर्डाने  ठरवून दिलेले  सारे  नियम कटाक्षाने पाळायचे. मिळालेल्या संधीचा लाभ घेत घरच्या होम पिचवर यथेच्छ लोळायचे ( घरीच आराम करायचा ). कोरोनाचा प्रत्येक बाऊंसर ( हल्ला ),डीप मिडविकेट, फाईन लेग,  कव्हर, पाँईट बाऊंड्रीच्या बाहेर भिरकवायचे. पुढयातले ( म्हणजे घराबाहेर जायचा मोह होणारे ) चेंडू अगदी सुनिल गावस्कर स्टाईलने सरळ बॅटने ( स्ट्रेट ड्राईव्ह ) सिमापार टोलवायचे. चोरटया धावा घेऊन त्याच्या कचाट्यात सापडायचे नाही. त्याचे आक्रमण शॉर्ट लेग, मिडॉन वर थोपवायचे. तो (आपल्या ) गलीत येणार नाही याची दक्षता घ्यायची. सतत काळजी घेत ( सामान्य माणसाने ) आपली विकेट सांभाळायची. झुंजार फलंदाजासारखी झुंज देत कोरोनाचे आक्रमण बोथट करायचे. प्राणाची बाजी लावून प्रतिकार करायचा. न घाबरता लढायचे. प्रत्येकाने आपली विकेट जपायची. एक जीवाने लढून आपल्या बरोबरच कुटुंबातील ( टिम) मेंबर्सची काळजी घेत विजयपथाकडे कूच करायची. अटीतटीच्या झुंजीत मात्र आपणच बाजी मारायची व कोरोनाला पराभूत करून देशातून हद्दपार ( नायनाट ) करायचा.

             लोकहो जरा सावधान ! 
             सोडू नका आपले घरदार !! 
नाही तर होईल रवानगी दवाखान्यात !
तिथेही राहावे लागेल खबरदार !!
            नाही तर टांगावे लागेल !
            फोटोमध्ये भिंतीवर !!
            त्यामुळे घरातच बसा !
           असेल ते खा पोटभर !!
हे सारं पाळा, कोरोनाला जिवंत जाळा !
दुश्मनाची साजीश म्हणा किवा सृष्टीचा प्रकोप !!
आपला एकच निर्धार घरात राहायचं !
कोरोनालाच पळवून लावायचं !!


लेखक : - 
दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.

Email:  dattavighave@gmail.com

मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a comment