तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 12 April 2020

"कोरोना" च्या पार्श्वभूमीवर देशातला प्रामाणिक रियल हिरो म्हणजे भारतीय पोलीसदल .....!!
 "कोरोना" covid-19 या महाभयंकर साथीच्या आजाराने जगभरात थैमान घातलेले असतांना,या आजाराने जगभरात लाखों लोकांचे प्राण गेलेले आहेत, अमेरिका,इटली,चीन सारख्या महाप्रगत देशांनी या आजारासमोर गुडघे टेकलेले असतांना, भारता सारखा विकसनशील देश या आजाराचे काटेकोर रित्या अत्यंत नियोजन व साचेबद्ध पणे सामना करत आहे याचे कौतुक करावे तेवढे कमी आहेच,या गंभीर समस्येला देश तोंड देत असतांना या देशाचे खरे हिरो म्हणून कोण समोर येत असतील तर देशातील सर्व डॉक्टर, नर्स व दिवसरात्र पोटतीकडीने समाजासाठी काम करत असलेले स्वतःचा जीव धोक्यात घालून देशहितासाठी सर्व स्तरावर  कर्तव्य बजावत असलेले माझे "पोलीस बांधव" आहेत.
             या संकट काळात खरं तर सर्व जगाचे लक्ष भारत देशा कडे लागलेले आहे कारण चीन सोडला तर सर्वात जास्त लोकसंख्या असेलला देश,एकत्र कुटुंब पद्धती,अत्याधुनिक साधनांची कमतरता,इथल्या सामान्य लोकांमध्ये वैचारिक प्रगल्भतेची कमतरता असे अनेक कारणे सांगता येतील पण या भीषण परिस्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र देशहितासाठी आपला जीव धोक्यात घालून देशाची पोलीस यंत्रणा काम करत आहे अनेक डॉक्टरांनी (सर्वांनी नाही) कोरोना ला घाबरून जिवाच्या काळजीने आपली प्रॅक्टिस बंद केली पण कोणत्या पोलिसाने कोरोना ला घाबरून आपला नौकरी सोडली हे अद्याप ऐकलेले नाही.लोकांना घरी बसवण्या साठी पोलीस,बाजारात शिस्त लावण्यासाठी पोलीस,दवाखान्यात बंदोबस्ता साठी पोलीस,प्रतिष्टित नेत्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस,रस्त्यावर पेट्रोलिंग साठी पोलिस, देवाच्या यात्रेत शिस्त लावण्यासाठी पोलीस, अपघात झालेल्या ना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी पोलीस,गल्ली बोळातल्या टुकार आयाराम-गयारामाना नीट धडा शिकवणारी पोलीस,विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरक्षित पार पाडून देणारी पोलीस, प्रसंगी नवरा - बायकोचे भांडण  मिटवणारी सुद्धा पोलिसच.जेवढे सांगता येईल तेवढे कमीच आहे खरं म्हणजे एखाद्या तालुका स्तराच्या शहराची लोकसंख्या 1 लाख ते 2 लाख असते मात्र त्याच शहरात पोलीस असतात 200 ते 250 कसे करायचे सर्व शहर मॅनेज, कशी चालवायची शहरातील समस्यांची  यंत्रणा ?? फार कठीण प्रश्न आहे!
पण ना कधी स्टाफ वाढवा ,ना मनुष्यबळ वाढवा,ना कामाचा व्याप कमी करा म्हणून आंदोलन केलेले पोलीस  आपण पाहिले ??  कधी पगार वाढ द्या म्हणून पोलिसांनी आंदोलन केले/मागणी केली असे मी तर अद्याप पाहिलेला नाही,कदाचित पोलिस दलाच्या नियमाने ते करता ही येत नसेल पण त्यांना प्रपंच नाहीय का ? इतर सरकारी नोकऱ्याच्या तुलनेत  तुटपुंज्या पगारीवर काम करणारे,पूर्ण वेळ जोखीम पत्करून  24 तास सदैव जनहितार्थ सावध असणारा पोलीस कधी केव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निरोप येईल कधी कुठे दंगा, भांडण  अशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होईल व त्याला जावे लागेल हे कधीच सांगता येत नाही मात्र तटस्थ पणे हसतमुखाने मोठया मनाने परिस्थितीचा सामना करायला सदैव तत्पर तयार असणारा व्यक्ती म्हणजे म्हणजे पोलीस होय...
कोरोना चा सामना करतांना भारतीय पोलिसदल जीवावर उदार होऊन काम करत असतांना दिसत आहे ,लॉकडाऊन चे नियम तोडत स्वतः बरोबरच इतरांचे पण आयुष्य धोक्यात घालणाऱ्या नालायक लोकांना समजाऊन सांगण्यात पोलिसांना नाकेनऊ येत आहेत एरव्ही महिनाभर भाजी खाणार नाहीत पण प्रशासनाने दिलेल्या वेळेत बाजारात गर्दी करणारे नालायक लोकांना पण पोलिसांना फेस करावे लागते रोज विचित्र लोकांना सामोरे जात असताना आता काही देशद्रोही तर पोलिसांवर हात उगारायला सुद्धा कमी करत नाहीयेत,हे कुठं तरी थांबलं पाहिजे.अशांवर शासनाने कडक पावले उचलली पाहिजेत या प्रसंगी पोलिसांचे मनोबल वाढावे या साठी शासनाने त्यांचा विमा उतरवणे त्यांना वाढीव पगार देऊन त्यांचे मनोबल वाढवणे गरजेचे आहे.
शेवटी इतकेच म्हणेल की खऱ्या अर्थाने देशाचे हिरो ठरत असलेल्या "पोलीस यंत्रणा" यांना मी अगदी मनापासून नमन करतो व त्यांच्या त्यागाचा समाजातील प्रत्येक घटकाने विचार करून कोरोना आजाराच्या महासंकटात देश वाचवण्यासाठी योगदान दयावे हीच अपेक्षा...
प्रा पवन मुंडे
नगरसेवक
नगरपरिषद
परळी वैजनाथ

No comments:

Post a comment