तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 24 April 2020

पुण्यात मजुरीसाठी गेलेल्या त्या कुटुंबांना ना.धनंजय मुंडे यांनी घरपोच पोहोचवली मदत


परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :-  लाॅकडाऊनचया काळात  पुण्यात  अडकलेल्या परळी  मतदारसंघातील  पंचवीस  कुटुंबांना राज्याचे  सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी घरपोच  अन्न  धान्याची  मदत  पोहोचवली. परळी  येथे  नाथ प्रतिष्ठानच्या वतीने हजारो  गरजूंना  धान्य व  भाजीपाला वाटप करुन  सामाजिक  दायित्व  पार  पाडले आहे.
     परळी  मतदारसंघातील  पंचवीस कुटुंब  हडपसर  जवळील कृषणानगर, महमंदवाडी  या  भागात  राहत आहेत. लाॅकडाऊन  सुरू  झाल्याने  त्यांचा  काम  धंदा  बंद  झाला. हे सर्व  संकटात  सापडण्याची  माहिती  राज्याचे  सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे  यांना  समजताच  त्या  सर्व कुटुंबाला  आवश्यक  धान्याचे  किट  त्यांनी  घरपोच  पोहोचवण्याची  व्यवस्था केली.
  केवळ  जिल्हाच  नाही तर  जिलहयाबाहेर  राहणाऱ्या  आणि  कोरोना  मुळे  संकटात सापडलेल्या माणसांना  कोणीही  उपाशी राहू नये याची काळजी  ना. धनंजय मुंडे  घेत आहेत. पुण्यातील  त्या सर्व  कुटुंबानी  धनंजय मुंडे  यांचे  आभार  मानले आहेत.

No comments:

Post a Comment