तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 12 April 2020

कष्टाने पिकवले भेंडी , पण कोरोणाने माती झाली खडकी येथील शेतकऱ्यांचे भेंडी व कांदा या पिकांचे मोठे नुकसान


  साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 
            कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बंदची घोषणा केली.भारत बंद करून राज्य व जिल्ह्याच्या सिमा बंद करण्यात आल्या. यामुळे 
शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.सेनगाव तालुक्यातील खडकी  येथील  शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात  सहा एकर कांदा आणि चार एकर भेंडी ची लागवड केली. पण कोरोना व्हायरस मुळे भारत बंद केल्याने भेंडी व कांदा शेतातच खराब होवून लाखों रुपयांचे नुकसान होत असून याचे पंचनामे करून नुकसान आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी खडकी येथील शेतकरी गोपाळ पांडुरंग फटागरे यांनी केली आहे 
          खडकी  येथील मुरमाड तसेच लाल माती असलेल्या जमीनीवर शेतकरी गोपाळ पांडुरंग फटागरे यांनी आपल्या चार   एकर जमीनीत भेंडी व सहा एकर जमीतीण कांदा पिकाची लागवड केली आहे पिकाला लागवडी पासुन ठिबकद्वारे पाणी, , फवारणी असे आज पर्यंत चार एकर भेंडी साठी त्यांनी दोन लाख रुपये खर्च केला आहे. व कांदा या पिकासाठी त्यांनी चार लाख रुपये खर्च केला रात्रंदिवस मेहनत करून भेंडी व कांदा पीकही जोमाने आले आहे. सध्या कांदा हें पीक काढले आहें व भेंडी देखील मोठ्या प्रमाणात काढण्यासाठी आली तयार आहे, पण भेंडी व कांदा विक्री ला  बाजार नाही. कोणीही खरेदी करत नाही. सर्वच ठिकाणच्या बाजारपेठा बंद असल्याने काढून विक्री कुठे आणि कशी करायची असा प्रश्न गोपाळ फटागरे  यांना पडला आहे. प्रत्येक शेतकरी स्वतः आपल्या मालाची विक्री करू शकत नाही. त्याला बाजारपेठेचा आणि विक्रीचा अनुभव नसतो, आणि आलेले व्यापारी पण मला घेत नाहीत 
कष्ट आणि अनेक विघ्नातून वाचवलेले पीक जर  विकावे तरी कूठे असा प्रश्न या शेतकऱ्यांच्या समोर ऊभा शेतकऱ्यांपुढे कोणताही पर्याय नाही आत्ता नाही आत्ता पर्यंत भेंडी व कांदा या पिकांवर त्यांनी सुमारे 6लाख रुपये खर्च झाला असून नेमका हा खर्च निघण्याच्यावेळी बाजारपेठा बंद असल्याने आतापर्यंत एक रुपयाही यातून प्राप्ती झालेली नाही. लाखों रुपयांचे उत्पन्न तयार असताना नुकसान सहन करावे लागत आहे. प्रशासनाने पंचंनामे करुन आर्थिक मदतीचा हात द्यावा हिच राज्य शासनाला कळकळीची विनंती आहे. असे यासंदर्भात  शेतकरी यांनी सांगितले.  गोपाळ फटागरे यांनी सांगितले आहे दरम्यान लागवड केली आहे.मात्र आपल्याच मेहनतीचे पीक डोळ्या देखत शेतातच खराब होत असून लाखों रूपयांचे नुकसान होत असल्याने या शेतकऱ्यांच्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले आहेत. मायबाप सरकारने याचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहें 
प्रतिक्रिया 

मी माज्या शेतात चार एकर भेंडी व सहा एकर कांदा लागवड केला आहें आत्ता पर्यंत मी भेंडी साठी 2लाख रुपये खर्च केला आहें कांदा या पिकासाठी 4लाख रुपये खर्च केला आहें आत्ता प्रयत्न मी 6 लाख रुपये खर्च केला आहें मात्र मी लागवड केलेला एक रुपया हि वसूल जाला नाही हें लॉकडाऊन मुळे हा विक्री कूठे करायचा सध्या रोजच चार ते पाच कुण्ट्ट्ल माल निघत आहें हा माल जाडलाच निब्बर होत आहें तरी मायबाप सरकारणे आमच्या शेतातील पंचनामा करून आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी 

शेतकरी गोपाळ पांडुरंग फटागरे रा .खडकी 

तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment