तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 9 April 2020

कष्टाने पिकवले खरबूज , पण कोरोणाने माती झाली खडकी येथील शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठे नुकसान  साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 
            कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बंदची घोषणा केली.भारत बंद करून राज्य व जिल्ह्याच्या सिमा बंद करण्यात आल्या. यामुळे 
शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.सेनगाव तालुक्यातील नखडकी येथील  शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात टरबूज  व खरबूज लागवड केली. पण कोरोना व्हायरस मुळे भारत बंद केल्याने टरबूज शेतातच खराब होवून लाखों रुपयांचे नुकसान होत असून याचे पंचनामे करून नुकसान आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी खडकी येथील शेतकरी अंकुश हराळ यांनी केली आहे व या भागातील शेतकरी वर्गातून होत आहे.
          खडकी  येथील मुरमाड तसेच लाल माती असलेल्या जमीनीवर शेतकरी अंकुश हराळ(वय 35) यांनी आपल्या दोन  एकर जमीनीत खरबूज पिकाची लागवड केली आहे टरबुजाची पण लागवड केली. टरबुज या पिकाला लागवडी पासुन ठिबकद्वारे पाणी, मल्चींग, फवारणी असे आज पर्यंत एकरी ६० ते ७० हजार रुपये खर्च केला आहे. रात्रंदिवस मेहनत करून खरबूज व टरबूजाचे पीकही जोमाने आले आहे. सध्या टरबुजाचे पिक काढणीसाठी तयार आहे, पण टरबूजाला बाजार नाही. कोणीही खरेदी करत नाही. सर्वच ठिकाणच्या बाजारपेठा बंद असल्याने काढून विक्री कुठे आणि कशी करायची असा प्रश्न अंकुश हराळ यांना पडला आहे. प्रत्येक शेतकरी स्वतः आपल्या मालाची विक्री करू शकत नाही. त्याला बाजारपेठेचा आणि विक्रीचा अनुभव नसतो, आणि आलेले व्यापारी सहज ३ रुपये, ५ रुपये किलो, 
किलो ने मागत आहेत. शेतात टरबूज तयार होण्यासाठी अंदाजे ६ ते ७ रुपये किलो खर्च करण्यात आला आहे. आणि खरेदी करण्यासाठी आलेला व्यापारी या सर्व परिस्थितीचा फायदा घेत टरबूज स्वस्त मागत असतील तर काय करायचं ? कष्ट आणि अनेक विघ्नातून वाचवलेले पीक जर कवडीमोल दराने मागितले तर शेतकऱ्यांपुढे कोणताही पर्याय उरत नाही.खरबूजा वर जवळपास 1 लाख रुपये खर्च झाला असून नेमका हा खर्च निघण्याच्यावेळी बाजारपेठा बंद असल्याने आतापर्यंत एक रुपयाही यातून प्राप्ती झालेली नाही. लाखों रुपयांचे उत्पन्न तयार असताना नुकसान सहन करावे लागत आहे. प्रशासनाने पंचंनामे करुन आर्थिक मदतीचा हात द्यावा हिच राज्य शासनाला कळकळीची विनंती आहे. असे यासंदर्भात  शेतकरी यांनी सांगितले. अंकुश हराळ यांनी सांगितले आहे दरम्यान यांच्या बरोबरच खडकी येथील बरेच शेतकरी  या गावात साधारणपणे 10 एकर क्षेत्रावर टरबूजाची लागवड केली आहे. या सर्व शेतकऱ्यांनी अत्यंत मेहनतीने खरबूज व टरबूजाची जोपासना केली असून टरबूजाचे पीक अगदी जोमाने आले आहे. मात्र आपल्याच मेहनतीचे पीक डोळ्या देखत शेतातच खराब होत असून लाखों रूपयांचे नुकसान होत असल्याने या शेतकऱ्यांच्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले आहेत. मायबाप सरकारने याचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a Comment