तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 April 2020

विधवा,दिव्यांग,अंध,व वृद्धांना अन्न धान्य वाटप


 वाशिम दि.२२:(फुलचंद भगत)    फ्रेंड्स आफ द अर्थ अँड नेचर कंझर्व्हेटर या संस्थेतर्फे गरजू निराधार विधवा परित्यक्ता  अपंग दिव्यांग महिला व त्यांच्या कुटुंबीयांना अन्नपदार्थ,किराणा व अन्नधान्याची मदत.
कोरोना विरूद्ध लदाईत फ्रेंड्स ऑफ दी अर्थ अँड नेचर  कंझर्व्हेटर (फेन्स) व छत्रपति शिवाजी महाराज  बहुउददेशीय संस्था  महत्वाची भूमिका बजावत आहे.  ज्यांना
अत्यावश्यक आहे असे विधवा, दिव्यांग, अंध,वृद्ध महिला व त्यांच्या वर आधारित असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांना  तसेच गरीब व ज्यांचा दैनंदिणी कामावर उदरनिर्वाह आहे असे अत्यंत गरजू कुटुंबांना संस्थे चा वतीने  प्रशांत वाघमारे, रवींद्र वाघमारे, रमा कोकरे, बाळासाहेब सुतारे, प्राची वाघमारे, रविष तेहरा यांनी वाशिम येथील विविध ठिकाणी तसेच नांदेड येथे किराणा, अन्न धान्य वाटप करण्यात आले. संस्थे च्या या कार्यात पोलिस कर्मचारी राजेश चक्रणारायान , पिंटू एरणे व ईतर कर्मचाऱ्यांनी ही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशीम
मो.8459273206/9763007835

No comments:

Post a comment