तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 18 April 2020

परळीत नियमाचा भंग करणाऱ्या २४७ जणावर कारवाई;९० हजाराचा दंड वसुल नगर परिषद व पोलिसांची संयुक्त कारवाई


परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :- कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन असतांना घालून दिलेल्या नियमांचा भंग करणाऱ्या परळीतील २४७ जणांवर नगर परिषद व परळी पोलीसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे ८० हजार रुपये एकुण दंड वसूल करण्यात आला.

कोरोना विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी जिल्हाधिकारी बीड यांनी घालून दिलेल्या आदर्श नियमांचा भंग करणाऱ्या २४७
नागरिकांवर आज परळी पोलीस व नगर परिषदेने संयुक्त कारवाई केली. शहरातील प्रमुख भागात ही कारवाई करण्यात आली.

फिरतांना मास्कचा वापर न करणे, विना परव ना बाहयांबर शहरात फेरफटका मारणे, अस्थापनासमोर सोशल डिस्टन्सिंग न ठेवणे अशा कारणावरुन हा दंड करण्यात आला.
सुमारे ८० हजार रु. याद्वारे वसुल करण्यात आले आहेत.
या वेळेत नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी संचारबंदी शिथिल करण्यात येते. या काळात दुचाकी, चारचाकी वाहने न वापरत पायी चालत जाऊन आवश्यक ते सामानाची खरेदी करावी आशी अपेक्षा असून तसे नागरिकांना प्रशासनाने आवाहन केले आहे. मात्र तरीही नागरिक मोठ्या प्रमाणात वाहनांचा वापर करत असल्याने सांगूनही न ऐकता विनाकारण वाहने वापरणारी विरोधात पोलीस प्रशासनाने कारवायीचा बडगा उगारला आहे. शुक्रवारी दि. 17 रोजी संचारबंदी काळात दुचाकी घेऊन बाहेर पडलेल्या बीड शहर पोलीस ठाणे 53 ,पेठ बीड ठाणे 14 ,शिवाजी नगर 50 ,पिंपळनेर 40,अंबाजोगाई ग्रामीण 23,अंबाजोगाई शहर 50,परळी शहर 5 ,संभाजी नगर 6 अशा एकूण 246 दुचांकिवर कारवाई करुन त्या जप्त करण्यात आल्या आहेत,तर याप्रकरणी चालकांवर 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने दुचाकीचा वापर न करता पायी चालत जाऊन जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a comment