तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 25 April 2020

अ.भा वारकरी मंडळाची अशी ही सामाजिक बांधिलकी न.प. कर्मचारी, पेपर वितरक, हॉटेल कामगारांना केले मास्कचे वाटप

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
राज्य व देशभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने आज गुरुवार दिनांक 23 एप्रिल रोजी परळी शहरातील विविध क्षेत्रातील कामगारांना अ.भा. वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते मास्कचे वाटप करण्यात आले.
आज गुरुवार दिनांक 23 एप्रिल रोजी अखिल भारतीय वारकरी मंडळ शाखा परळी वैजनाथच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अ.भा. वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते परळी शहरातील नगर परिषदेतील सफाई कामगार, वर्तमानपत्र वितरक, हॉटेल कामगार यांना सोशल डिस्टसिंगचे पालन करून मास्क चे वाटप करण्यात आले.यावेळी बोलताना अ.भा. वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे म्हणाले की, अ.भा. वारकरी मंडळ शाखा परळी वैजनाथ नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असून वारकरी मंडळाने मास्क वाटपाचा घेतलेला कार्यक्रम अत्यंत कौतुकास्पद असून सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी अ.भा. वारकरी मंडळाचे तालुका अध्यक्ष विश्वंभर महाराज उखळीकर, तालुका सचिव विश्वास महाराज पांडे, शहराध्यक्ष अशोक महाराज कराळे, शहर सचिव ज्ञानेश्वर महाराज कतारे, सुरेश महाराज मोगरे, अविनाश महाराज शिंदे, वृक्षराज महाराज आंधळे, गोविंद महाराज नंदनजकर, महादेव महाराज उखळीकर यांच्यासह वारकरी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a comment