तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 April 2020

अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन मध्ये बनवण्यात आलेल्या सँनिटायझर रुमचे अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्नअंबाजोगाई (प्रतिनिधी) :- 
कोरोना सदृश्य परस्थिती लक्षात घेता अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनमध्ये बनवण्यात आलेल्या सँनिटायझर रुमचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या हस्ते आज संपन्न झाले. या वेळी शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे यांच्या सह सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी सँनिटायझर रुम बनवण्यासाठी ज्यांचं योगदान लाभले असे सर्व मान्यवर उपस्थित होते.

    जगभरात थैमान घातलेल्या कोरोना या महामारी पासून संरक्षण व्हावे या साठी ज्या ज्या उपाय योजना केल्या जात आहेत त्या मध्ये सर्वात महत्वाची काळजी घेण्याचा प्रकार हा स्वतःहा वारंवार सँनिटायझर करून घेण्याचा असुन मागील काही दिवसात सोशल मेडियावर मेट्रोपोलिटन शहरात गर्दीच्या शासकीय कार्यालयात सँनिटायझर रुम बनवल्याचे पाहिल्या नंतर याचा अभ्यास करून अंबाजोगाई येथील टी.बी. गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रदीप लहुदास जाधव या ईलेक्ट्रोनिक्स तर रविंद्र उत्तमराव राठोड या मँकेनिकल  बी.ई. च्या विद्यार्थांनी व बिजीएसचे धनराज सोळंकी यांनी पुढाकार घेऊन अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन मध्ये  सँनिटायझर रुम बनवण्यासाठी प्रयत्न सुरु केले, या दोन विद्यार्थाना रुम बनवण्यासाठी आवश्यक असलेले कांही साहित्य नवजीवन मशनरी स्टोअर्सचे मालक व बिजेएसचे संचालक धनराज सोळंकी यांनी अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनला पुरवले.

   या सँनिटायझर रुमचे रीतसर उद्घाटन आज अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे यांच्या सह पोउनि दहिफळे, पोउनि सुर्यवंशी यांच्या सह प्रदीप जाधव  व रविंद्र राठोड, धनराज सोळंकी व सँनिटायझर रुमची सजावट ज्यांनी केली असे रो. स्वप्नील परदेशी, स पो उ नी गायकवाड, ठाणे अंमलदार चव्हाण मॅडम, पोहेकाँ अभिमान भालेराव, पो काँ चाटे गणेश घोलप, सुरवसे, पो ना आनंद येलमाटे, एम व्ही आवले, एस के घोडके, कांबळे, सोपणे सह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

    यावेळी बोलताना स्वाती भोर म्हणाल्या की, आमचे पोलिस बांधव 24 तास बाहेर असतात त्यांचा दिवस भरात असंख्य नागरिकांशी संपर्क येत असतो त्या मुळे पोलीस स्टेशन मध्ये सँनिटायझर रूमची अवश्यकता होती व वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रदीप जाधव, रविंद्र राठोड व धनराज सोळंकी यांनी पुढाकार घेतला व ही सँनिटायझर रुम तयार करून आम्हाला दिली त्या बद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

    या वेळी सँनिटायझर रुम तयार करणारे प्रदीप जाधव यांनी रुमच्या निर्मिती आणि वापराबद्दलची तांत्रिक माहिती दिली. या रुममध्ये अँटोमँटीक सेंसार बसवण्यात आले असून या रुम मध्ये व्यक्ती गेली की हे सेंसार सँनिटायझरची प्रक्रिया सुरु करेल व ठराविक सेकंदानंतर ही प्रक्रिया अँटोमँटीक बंद होईल. या वेळी अभिमान भालेराव यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a comment