तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 April 2020

नंदनज येथे सोशल डिस्टन्सींग ठेवत तलाठी अमोल सवईशाम यांच्या उपस्थितीत रेशनचा मोफत धान्य वाटपपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या निराधार आणि गरजवंत लाभार्थ्यांची उपासमार टाळण्यासाठी प्राप्त झालेल्या शासनाच्या वतीने नदनंज येथे रेशन धान्य दुकानातील मोफत धान्य तलाठी अमोल सवईशाम यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात येत आहे. तलाठी अमोल सवईशाम हे लाँकडाऊनच्या काळात कोरोना संदर्भात जनजागृती करणे असो कोणतीही माहिती असो गावातील सर्वांना देऊन नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. सोशल डिस्टन्स चा अवलंब करत राशनचे धान्य  वाटप केले.
     कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लाँकडाऊन आहे. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबाना याचा मोठा फटका बसत आहे. गावातील गरीब कुटुंबांना काही जीवनावश्यक वस्तू मिळणे कठीण झाले आहे. प्रशासनाच्या वतीने रेशनचे मोफत धान्य व गावातील गरीब गरजू कुटुंबांना वाटप करण्यात येत आहे. 
    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाॅकडाऊन आहे, हातावर पोट असणारे, रोजंदारी, कष्टकरी कामगार व गोरगरीब जनता यामुळे मोठ्या अडचणीत सापडली आहे.    
संपूर्ण देशात लाकडाऊन घोषित करण्यात आले आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात जनजीवन जागच्या जागीच थांबले आहे. या शिवाय स्थानिक नागरिकांच्या हाताला काम नसल्यामुळे मजूरीची रक्कम मिळत नाही गाेर गरीब जनतेची अक्षरशा फरफट होत आहे. सदरहु मजूरांना व गरीबांना अन्नधान्य मिळत नाही त्यामुळे साहजिकच त्यांचे कुंटुबियाला उपासमारी ला समाेर जावे लागत आहे. प्रशासनाने अश्या गरीब व मजूर लोकांना तात्काळ रेशन कार्डव्दारे मोफत धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वस्त धान्य दुकानातील रेशनचा मोफत धान्य सोशल डिस्टन्सींग नियमांचे पालन करून तलाठी अमोल सवईशाम व दुकानदार यांच्या अतिशय उत्कृष्ठ नियोजनात लाभार्थ्यांचे मोफत धान्य वाटप करण्यात आले. कोरोनाच्या जनजागृती व राशनचे मोफत धान्य उत्कृष्टपणे नियोजनात वाटप केल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment