तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 April 2020

मुंबईहून आलेल्या डाॅक्टरला गेवराई येथे होम कोरंटाईन


सुभाष मुळे..
-----------------
गेवराई , दि. १५ _ बीड जिल्ह्याच्या गेवराई येथील रहिवासी व मुंबई येथील नामंकित दवाखान्यात आरोग्य सेवा  देणाऱ्या एका डाॅक्टराला मंगळवारी राञी प्रशासनाने गेवराई येथील पोलिस स्टेशन जवळील निवासस्थानी होम कोरंटाईन केले आहे.
     गेवराई शहरातील पोलिस स्टेशन जवळील रहिवासी असलेले एक डाॅक्टर हे दहा ते पंधरा वर्षापासून मुंबई येथील एका नामनकिंत दवाखान्यात आरोग्य सेवा म्हणून काम करत आहे. आजवर त्यांची ही सेवा कायम आहे. सध्या जगात कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे नागरिक हतबल आहेत. भारत देशात सर्वाधिक रुग्ण हे मुंबई येथे आढळून येत आहे. अशातच मुंबई येथील व सध्या गेवराई येथे निवासस्थान असलेले हे डाॅक्टर सोमवारी राञी आपल्या वाहनातून गेवराईत आले आहे. त्यामुळे मुंबई येथील हे डाॅक्टर असल्यामुळे परिसरातील नागरिकांंत भितीचे वातावरण निर्माण होऊन हि माहिती या भागातील नागरिकांनी गेवराई प्रशासनाला दिली. डाॅक्टर हे सोमवारी राञी दहाच्या सुमारास मुंबई येथून आपल्या वाहनातून गेवराई येथे आले होते. हे डाॅक्टर मुंबई येथून गेवराईकडे येत असताना ठिकठिकाणी चेक पोस्ट असताना गेवराईत पोहचलेच कसे ? त्यांना कोणीच विचारणा का केली नाही, असे एक ना अनेक प्रश्न गेवराई शहरातील नागरिकांतून उपस्थित झाले.
     त्यानुसार मंगळवारी राञी आठच्या सुमारास आरोग्य विभागातील डाॅ. शेख, आंधळे व अन्य डाॅक्टरसह तलाठी राजेश राठोड, पोलीस आईटवार आदिंनी पोलिस स्टेशन जवळ असलेल्या यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना होम क्वारांटाईन केले आहे.

------------------------------
पत्रकार : सुभाष मुळे, गेवराई
मो. 94 2224 3787

No comments:

Post a comment