तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 April 2020

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार मित्रांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद


मुंबई (प्रतिनिधी) :-;
सध्या महाराष्ट्रात किंबहूना जगावर मोठे संकट ओढावले आहे. या संकटाला घरीच राहून आपल्याला पराभूत करता येणार आहे. घरीच रहा, सुरक्षित रहा या धोरणाचे पालन करत राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी आज पत्रकार मित्रांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

कोरोनाविरोधातील लढाईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत मदत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवती काँग्रेस, फादर बॉडी, विविध सेल सर्वच जण सामान्यांच्या मदतीला धावून जाताना दिसत आहेत. कोरोनाचा हे संकट लवकर टळो हेच प्रयत्न आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोट्यातून विधान परिषदेवर पाठवण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने दिला आहे. मा. राज्यपाल लवकरच याबाबत निर्णय घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. कायद्याच्या चौकटीबाहेर जावून कोणीही काम करणार नाही याची मला खात्री आहे.

कोरोनाचं एवढं मोठं संकट असताना मध्यप्रदेशात भाजपने काँग्रेसचे सरकार पाडले. संकटाच्या काळातही भाजपच्या मंडळींना सरकार पाडण्याचं सुचतं ही दुर्दैवी बाब आहे. जनतेचे काय होईल याचे घेणे देणे नाही. भाजप फक्त राजकारणाला प्राधान्य देतं हे यातून स्पष्ट होतं. मागे बातम्यांमध्ये वाचले की कोरोनासाठी येणारी मदत जर पंतप्रधान केअरला दिली तरच सीएसआर फंड म्हणून गणली जाईल राज्य सरकारला दिली तर नाही. हे कोत्या प्रवृत्तीचे लक्षण आहे. भाजप राजकारण करण्यात मश्गुल आहे हे देशातील जनतेला कळून चुकले आहे.

आपल्या हातात सत्ता नाही म्हणून काही लोकं सध्या अस्वस्थ आहेत. त्या नैराश्येपोटी ते सरकारविरोधात हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. मा. मुख्यमंत्री, मा. आरोग्यमंत्री लोकांमध्ये जावून काम करत आहेत, त्यामुळे लोकांचा सरकारवर पूर्ण विश्वास आहे. भाजपने काहीही प्रयत्न केले तरी ते सफल होणार नाही. सरकार खंबीर आहे, १५ वर्षे टिकणार! संकटाच्या काळात खांद्याला खांदा लावून काम करायचे असते मात्र भाजपला ते जमत नाही. भाजप म्हणते आम्ही इतक्या लोकांना भोजनाची व्यवस्था केली मात्र प्रत्यक्षात तसं काही दिसलं नाही.

राज्याच्या तिजोरीत सध्या काहीच नाही. मार्चमध्ये लोकं मोठ्या प्रमाणात कर भरत असतात मात्र लॉकडाऊनमुळे लोकांना ते करता आलं नाही. राज्याला आर्थिक चणचण भासणार मात्र महाराष्ट्र हे सक्षम राज्य आहे. महाविकासआघाडी सरकारच्या नेतृत्वात महाराष्ट्र या संकटाला तोंड देणार. शासन राज्यातील ३ कोटी जनतेला स्वस्त दरात राशन उपलब्ध करून देणार आहे. मे व जून या पुढील दोन महिन्यासाठी राशन पुरवले जाणार ज्यासाठी शासन साडे चारशे कोटी रुपये खर्च करणार आहे.

देशभरात सर्वात जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्याला सर्वात जास्त केंद्राच्या मदतीची गरज आहे पण तसं सहकार्य मिळत असल्याचे अनुभव नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मागण्यांचे जे पत्र लिहिले त्याला अजून उत्तर आलेले नाही.

जिथे रुग्णांची संख्या कमी आहे तिथे लॉकडाऊन शिथिल करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. ग्रामीण भागात अर्थव्यवस्था सुरळीत करावी लागेल. ग्रामीण भागातील उत्पन्न वाढवावे लागेल. या सगळ्यातून बाहेर पडण्याची आपल्याला सुरुवात करावी लागेल.

No comments:

Post a comment