तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 18 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार व नागरिकांना सँनिटीयझरचे वाटप ; परळी स्वस्त औषधी सेवा जेनरिक मेडिकल चे संचालक संजय कराड यांचा पुढाकार


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- संपूर्ण देशात व राज्यात कोवीड-19 म्हणजेच या विषाणूमुळे सध्या समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संकटात आहोरात्र काम करणारे पत्रकार व नागरिकांना सेनिटरायझर बाँटलचे वाटप करण्यात आले आहे. संजय कराड यांच्या पुढाकाराने, सामाजिक बांधिलकी जोपासत वाटप करण्यात आले आहे.
       कोरोनाच्या आहाकाराने नागरिक हैराण झाले आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी
केंद्र व राज्य सरकारने सर्वत्र लॉकडाऊन  जाहीर केले आहे. नागरिकांना घराबाहेर पडणं धोक्याचे बनलं आहे. कोरोना ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गोरगरीब नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाच्या संकटाचा सामना प्रत्येकजण जबाबदारी निहाय करीत आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार हे पण कोरोनाच्या लढाईत जिवाची परवा न करता ग्राऊंडवर जाऊन बातमी तयार करतात व ती बातमी आपल्या पर्यंत पोहोंचती करतात त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.  नागरिक ही आरोग्याची कोरोना हे संकट टाळण्यासाठी खबरदारी व सुरक्षितता घ्यावी म्हणून परळीतील स्वस्त औषधी सेवा जेनेरिक मेडिकल संचालक संजय कराड यांच्या पुढाकाराने सेनिटरायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी पत्रकार अनंत कुलकर्णी, महादेव गित्ते, अजय गित्ते , अजय कराड, विजयकुमार हाडबे, सोमनाथ चाटे, विकास आघाव व इतर नागरिक उपस्थित होते. कोरोनाच्या संकटसमयी संजय कराड यांनी जे सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a comment