तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 April 2020

तंत्रस्नेही शिक्षकांची डिजिटल शैक्षणिक चळवळ


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : लाॅकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, ते अभ्यासात गुंतून रहावेत, यासाठी ई-लर्निंगचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून चाचण्या, उपक्रम, खेळ, शैक्षणिक साहित्य तयार करण्याची संकल्पना आम्ही तंत्रस्नेही शिक्षक समूह प्रमुख व पासपोली बृहन्मुंबई मनपा मराठी शाळा क्र.१ मधील शिक्षिका वृषाली सुरेश खाड्ये यांनी अमलात आणली. स्वतः पाचवीसाठी चाचण्या, शैक्षणिक साहित्य तयार केले. इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचा  लाभ व्हावा, म्हणून समुहाच्या ब्लाॅगवर अपलोड करण्यात आल्या. याकामी संदीप सोनासर (जळगाव) यांचे सहकार्य लाभले.
ऑनलाईन तंत्रज्ञान कार्यशाळेद्वारे शिक्षकांना उपयुक्त अॅपचे मार्गदर्शन केले जाते. वृषाली खाड्ये (मुंबई),
जयराम चव्हाण (नाशिक), राजेश चायंदे (अमरावती), गजानन पुंडे (बुलढाणा), सुरज कुदळे (नाशिक), संदीप सोनार (जळगाव), जावेद खान (मुंबई), लीला शिवदे (नाशिक) यांनी  मार्गदर्शन केले आहे.
गजानन पुंडे (बुलढाणा), श्यामसुरेश गिरी (लातूर), रसंदीप सोनार (जळगाव), विशाल पाटील (नंदुरबार), सुरज कुदळे (नाशिक), सुनीलकुमार बडगुजर (जळगाव), राजेश चायंदे (अमरावती), सुनिता अनभुले (मुंबई), साईली  राणे (मुंबई), ज्योती दुर्गे (पुणे), प्रकाश जाधव (लांजा), कौसर खानसतस‍ (मुंबई), ए. आर. गिरी (भंडारा),बसइला मिस्त्री(मुंबई), राजकुमार महादेव केदार,अंजली ठाकुर (यवतमाळ)
गोरखनाथ वंजारी (भंडारा), ज्ञानेश्वर नामदेव पाटील (नंदुरबार), तसतीश दुवावारर(चंद्रपूर),कमलेश चरडे (यवतमाळ),भोसीकर एस.व्ही.,महेश लोखंडे (सातारा) मंगला अळसपुरे(अमरावती), स्वराली लिंबकर (मुंबई), मंगल पवार (मुंबई), स्मिता पाटील (मुंबई), अस्मिता गवंडी (मुंबई), सपना हिरे (नंदुरबार), जयश्री माने (मुंबई), वंदना पाटीलभ (मुंबई), अंकुश गावंडे (अमरावती), विजय नेमाडे (अमरावती), वनिता सांगळे  यांनी ऑनलाईन चाचण्या तयार केलेल्या आहेत.
डाॅ. जितेंद्र लिंबकर हे व्हिडिओ द्वारे  शारीरिक शिक्षणाचे ज्ञान विद्यार्थ्यांना देत आहेत. आपले सामान्यज्ञान वाढावे यासाठी केबीसी सारखा ऑनलाईन खेळ संदीप सोनार (जळगाव जिल्हा समूह प्रशासक) यांनी तयार केला. या सर्व डिजिटल गोष्टींचा विद्यार्थी व शिक्षकांना फायदा होत आहे.
लाॅकडाऊनच्या काळात ई - पेपर व कथा, कादंबरी इ. पुस्तके वाचणा-यांची संख्याही वाढत आहे. वर्तमानपत्र,वाचन संस्कृती जपूया! यासारख्या समुहाद्वारे वाचक आनंद मिळवित आहेत.याकामी जागीरदार अ.वहाब अ.नजीब (लातूर) व राजेश चोपडे (बुलढाणा) हे शिक्षक नियमित ई पेपर समुहात पाठवित आहेत. लेखक वासुदेव पाटील, लेखक दिलीप जाने (जळगाव) यांच्या कथा व  भारती डहाळे,सुनीता मोरे यांनी समूहात पाठवलेल्या कथा वाचकांची उत्कंठा वाढत असताना दिसते.छावा कादंबरीचे ई- वाचन भारती डहाळे करीत आहेत.
शिक्षकांचे ज्ञान अपडेट रहावे, यासाठी समुहातर्फे मंगळवारी ऑनलाईन चाचणी आयोजित केली जाते. नियोजनानुसार प्रशासक प्रश्नपत्रिका काढून चाचणी प्रमुख भालचंद्र भोळे गुगल फाॅर्मवर पेपर सेट करतात. एक हजारपेक्षा अधिक  शिक्षक सहभागी होतात. स्पर्धेच्या वेळी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांना  ई प्रमाणपत्र दिले जाते. याकामी सुरज कुदळे (नाशिक) व सुनील द्रविड (कोल्हापूर) यांचे खूप सहकार्य मिळते.
अजित तिजोरे (मुंबई) यांचा नियमित एक प्रश्न व गणिताशी संबंधित प्रश्न, अशोक कुमावत (नाशिक) यांची प्रेरणादायी  सकारात्मक विचार मालिका, ज्योती वाघमारे (सोलापूर) यांची नैतिक मूल्ये कथा, जयश्री माने (मुंबई) यांचे ज्ञानकुंभ भाषिक उपक्रम, भालचंद्र भोळे (ठाणे) यांचे टेक्नो न्यूज, सतीश दुवावार (चंद्रपूर) यांचे वैज्ञानिक सदरं प्रत्येक आठवड्यात शिक्षकांपर्यत पोहचते. समुहाच्या उपक्रमात शिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून विद्यार्थीही या काळात याकरीता ई लर्निंग करताना दिसतात,असे वृषाली खाड्ये सांगतात.

No comments:

Post a comment