तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 April 2020

मंगरुळपीर येथील सफाई कामगारांची छाती अभिमानाने फुगली
जिल्हा परिषद अध्यक्षांनी पुष्पहार व भेट वस्तू देऊन  केले कौतुक

मंगरुळपिर ता १४:(फुलचंद भगत)  सफाई कामगार हे नेहमी लोकांच्या तिरस्काराचा विषय असतात.मंगरुळपिर शहरात लॉकडाऊनमध्ये सर्व काही सुरळीत चाललं आहे. शहरात सर्वत्र कोरोना विषाणूंचे भय असतानाही स्वतःचा जीव धोक्यात घालून शहरात काम करणाऱ्या सफाई कामगार काम करीत आहेत.सफाई कामगार समाजा पासून वंचितच राहिलेला घटक आहे. आज करीत असलेले त्याचे कार्य समाजाला खूप काही सांगून जात आहे अश्या वंचित व दुर्लक्षिताचे कैवारी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी समाजा साठी महान काम करणाऱ्या या सैनिकांना मानाचा मुजरा असल्याचे वक्तव्य वाशिम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले.यावेळी नगर परिषदचे मुख्याअधिकारी मिलिंद दारोकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
         या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रकांतदादा ठाकरे मित्र मंडळ व शिवरत्न मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला. सर्व प्रथम वाशिम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार घालण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. नगर पालिकेच्या सफाई कामगारांचा येथील शिवरत्न मित्र मंडळ व चंद्रकांतदादा ठाकरे मित्र मंडळाने कृतज्ञ म्हणून सत्कार आयोजित केला होता . आज आपला देश कोरोनासारख्या व्हायरसशी लढा देत आहे.
या लढाईमध्ये पोलीस डॉक्टर नर्स शासकीय अधिकारी पदाधिकारी हे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांसाठी रस्त्यावर उतरून काम करत आहेत. या काळात जिल्ह्याची तसेच शहराची साफसफाई चांगली व्हावी, यासाठी सफाई कामगार जीवाचे रान करीत आहे. या कर्मचाऱ्यांचे आभार मानणलेच पाहिजे असे चंद्रकांत ठाकरे यांनी म्हटले यावेळी चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते ५६ सफाई कामगारांचा पुष्पहार व शर्ट,पॅन्ट,त्यांच्या गृहिणी करिता साडी,चोळी हे भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला तेव्हा सर्व कामगारांनी सोशल डिस्टन्स चे पालन केले कार्यक्रमाला नगर परिषद चे मुख्याधिकारी मिलींद दारोकार, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत पाकधने,नगर सेवक मोहम्मद अफसर,आकाश संगत, सफाई निरीक्षक राजेश संगत, कर निरीक्षक मो शफी,शिवरत्न मित्र मंडळ चे अध्यक्ष राहुल रघुवंशी, बाळासाहेब मांढरे,यांचेसह चंद्रकांतदादा ठाकरे मित्र मंडळाचे व शिवरत्न मित्र मंडळाचे कार्यकर्ते, नगर परिषद चे सर्वच कर्मचारी उपस्थित होते तसेच कार्यकर्त्यांनी या सफाई कामगारांचा टाळ्या वाजून आभार मानले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a comment