तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 April 2020

स्वयं शिक्षण प्रयोग कडून जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप
लातूर (प्रतिनिधी)


दिनांक १८/०४/२०२० निलंगा तालुक्यातील अंसरवाडा या गावात करून आपत्तीच्या लॉक डाऊन काळात गरजू व गरीब विधवा परित्यक्ता कुटुंबांना मदतीचा हात  म्हणून जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
संस्थापक प्रेमा गोपालन व डायरेक्टर ऑफ प्रोग्राम पाटील सर व प्रोग्रॅम डायरेक्टर तबस्सुम मॅडम यांनी निलंगा तालुक्यातील तालुका समन्वयक अंजना साबळे यांच्यामार्फत कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन च्या काळात गावातील गरजू विधवा परित्यक्ता अशा 25 कुटुंबांना जीवनावश्यक किट वाटप करण्यासाठी सांगितल्यानंतर गावातील सरपंच पद्मिनी ऊस नाळे, उपसरपंच बाबुराव ऊस नाळे चेअरमन कदम सर एन एम शेख मॅडम लीडर शीला माने केसेस जोशना विष्णू माने यांच्यामार्फत गावातील 25 कुटुंबांना मदत देण्यात आली.
वाटप करते वेळेस सोशल डिस्टन्स इन व हाताला सैनी टायझर लावण्यास सांगण्यात आले व शासनाने दिलेल्या नियमानुसार वाटप करण्यात आले.
संस्थेच्या वतीने विविध उपक्रम
स्वयं शिक्षण प्रयोग च्या वतीने व्यवसायिक महिलांना प्रशिक्षण देणे व्यवसायिक महिलांना व्यवसाय उभारण्यासाठी फंड देणे विविध विषयावरील प्रशिक्षण देणे. महिलांना शाश्वत शेती अन्नसुरक्षा महिला सक्षमीकरण इत्यादी गोष्टीवर प्रशिक्षण दिले जाते त्याच बरोबर तळागाळातील महिलांना रोजगाराच्या विविध संधी मिळवून देण्याचे काम स्वयं शिक्षण प्रयोग आंतर्गत केले जाते

No comments:

Post a comment