तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 25 April 2020

दबंग सपोनि अजिनाथ मोरे यांची गावठी दारुभट्टीवर कारवाई

गावठी दारुनिर्मीतीवर छापा,मुद्देमाल जप्त करुन जागीच केला नष्ट

पोलिसांच्या कारवाईमुळे गावठी हातभट्टी दारुविक्रेत्यांचे धाबे दणानले

वाशिम(फुलचंद भगत)-मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार परिसरातील गावठी हातभट्टीची दारु निर्मीती करणारे व विक्रेते यांचेवर दबंग सपोनि अजिनाथ मोरे यांनी  छापा कारवाई केली आहे त्यामुळे तालुक्यात आता अवैध दारुविक्रेत्याचे धाबे दणानले अाहे.
          
वाशिम जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव व संसर्ग होवु नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात दि.३ मे पर्यत संचारबंदिचे आदेश दिलेले आहेत.तसेच जिल्ह्यात देशी व विदेशी दारु विक्रीवर बंदी घालन्यात आलेली आहे.त्यामुळे गावठी हातभट्टीची दारु निर्मीती करणारे लोकांनी त्यांचा अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात गावोगावी सुरु केल्याचे मागील काही दिवसांमध्ये दिसुन येत होते तसेच त्यांच्याकडुन पैशाच्या हव्यासापोटी घातक दारुची निर्मीती होन्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सदर गावठी दारु निर्मीती करणारांवर कठोर कायदेशिर कारवाई करन्याबाबत पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांनीही सुचना दिल्या होत्या.त्याअनुंषगाने दि.२१ एप्रील ते २४ एप्रिल २०२० या चार दिवसात ऊपविभागिय पोलिस अधिकारी यशवंत केडगे,ठाणेदार धनंजन जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेलुबाजार दुरक्षेञाचे प्रभारी सपोनि अजिनाथ मोरे व त्यांच्या टिमने ग्राम पेडगाव,तांदळी,माळशेलु,शेलुबाजार,नांदखेडा,गोगरी,चिखली व हिरंगी या गावांमध्ये गोपनिय माहीतीच्या आधारे गावठी हातभट्टीची दारु निर्मीती व विक्री करणांरावर छापे टाकुन महाराष्ट दारुबंदी कायद्याप्रमाणे एकुन १३ जनांवर गुन्हे दाखल केले असुन आरोपी नामे नितीन परमेश्वर नितनवरे शेलुबाजार,सौ.इंदुबाई लक्ष्मण चक्रनारायण,निशा राजु चक्रनारायण शेलुबाजार,प्रमोद गुलाब पवार पेडगाव,महादेव केशव लठाड नांदखेडा,रामचंद्र बाबुजी सोनोने तांदळी,रंजना संजय जाधव पेडगाव,गोपाल बळीराम चव्हाण पेडगाव,संतोष गोरखु पवार हिरंगी,गजानन रामधन राठोड माळशेलु,परमेश्वर मोहन पवार माळशेलु,सिमा विनोद राठोड माळशेलु,अमरसिंग नरसिंग जाधव माळशेलु या आरोपितांवर परिणामकारक कठोर कायदेशिर कारवाई करन्यात आली असुन वेगवेगळ्या कारवाईमध्ये आरोपितांकडून मुद्देमालास जागीच नष्ट करन्यात आले.सदर कारवाई करुन मंगरुळपीर पोलिसांनी शेलुबाजार व आसपासच्या परिसरातील गावठी दारु निर्मीतीचे समुळ ऊच्चाटन करन्यात यश मीळवले आहे.
           सदरची कारवाई पोलिस अधिक्षक वसंत परदेशी,अप्पर पोलिस अधिक्षक विजयकुमार चव्हाण,ऊपविभागिय पोलिस अधिकारी यशवंत केडगे,पोलिस निरिक्षण धनंजय जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख सपोनि अजिनाथ मोरे तसेच त्यांचे टिम सदस्य पोऊनि मंजुषा मोरे,सुषमा परांडे,सपोऊनि भगत,पोहवा जवादे,कविता घाडगे,राठोड,नापोकाॅ पप्पुवाले,मुंदे,वानखडे,काकडे,पोकाॅ कव्हर,ठाकरे,मस्के,दहातोंडे,परसुवाले,शिंदे,भगत,गंडाईत,गाडे,वानखडे यांनी केले आहे.या कारवाईने मंगरुळपीर तालुक्यातील गावठी हातभट्टीची दारु निर्मीती आणी विक्री करणारांचे धाबे दणानले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206/9763007835

No comments:

Post a comment