तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 18 April 2020

शेतकऱ्याने कोरोनाच्या परीस्थिती मंदीला संधी म्हणून पाहण्याचा क्षण-दत्तात्रय वाघ


(विश्वनाथ देशमुख सेनगांवकर)


 सेनगांव:-  सध्या संपुर्ण जगासह भारतामध्ये  COVID19 कोरोनाचा प्रभाव अतिशय वेगाने वाढत आहे यासाठी त्याचा प्रभाव वाढू नये म्हणून शासनाने  लॉक  डाऊन केले आहे. पण यातून शेतकऱ्यांच्या शेत मालावरती अतिशय विपरीत परिणाम झाला आहे .अनेक शेतकऱ्यांनी  शेतमाल पिकवला आहे परंतु सर्व बाजार समित्या बंद आहेत, तसेच सर्व कृषी प्रक्रिया उद्योग बंद आहेत, कोणत्याही शेतीमालाला सध्या विक्रीसाठी कोठेही ठिकाण नाही.सध्या देशातील गरिबातील गरीब व्यक्ती व श्रीमंतातील श्रीमंत व्यक्ती फक्त तुरदाळ ,डाळी खाताना दिसून येत आहे अनेक शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकता येत नसल्याने काही लोक ते काढून टाकत आहे तर काही जनावरांना खाद्य म्हणून पुरवत आहेत, यातून त्यांच्या लागवडीपासून काढणीपर्यंत खर्च वाया जाऊन ते कर्जात डूबत आहेत.  लॉक डाऊन मुळे बंद स्स्थिती पुढील पंधरा मे पर्यंत असेच राहून गेली तर भारतात आर्थिक आणीबाणी ही लागू शकते ,यातून अनेक छोटे उद्योग, कृषी प्रक्रिया उद्योग त्यावर चालणारे सर्व यंत्रणा बंद पडून शेतकरी देशोधडीला जाण्याची शक्यता आहे ,सध्या कृषीला आवश्यक असणाऱ्या सर्व उद्योगधंदे बंद असल्याने शेतीला आवश्यक असणारे खत बी-बियाणे अवजारे महाग होण्याची शक्यता आहे. 
        बंदच्या कालखंडात काही ठिकाणी काही शेतकरी आपला शेतमाल डोक्यावर घेऊन प्रत्येक गावात विक्रीसाठी जात आहेत,यातून अनेक संकल्पना पुढे येऊ घातल्या आहेत या मंदीच्या च्या काळाला संधी म्हणून शेतकऱ्यांनी पाहिले तर शेतकरी सुधारण्यास वेळ लागणार नाही.

 यापूर्वीही शेतकरी आपला शेतमाल  थेट ग्राहकास विकत नव्हता म्हणजे कोणाच्यातरी मध्यस्थीने तो आपला शेतमाल ग्राहकापर्यंत पोहोच करत होता ग्राहकापर्यंत पोहच करणारे जे माध्यम होते ते शेतकऱ्यांना लुबाडत होते व ग्राहकांनाही लुबाडत होते यातून त्याचा अर्थकारणावर परिणाम होऊन अर्थकारण बिघडत होते व शेतकरीही देशोधडीला जात होता मधली संकल्पना मात्र पैसे कमवून मोठी होताना दिसून येत होती. 
  यापूर्वीही शेतकरी डायरेक्ट ग्राहकाला  शेतमाल विकत नव्हता तो हे कोणत्यातरी मध्यस्थांच्या माध्यमातून शेतमाल विकत होता,  सध्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी याकडे डोळे उघडून पाहिले तर तोच मध्यस्थाची भूमिका  पार पाडू शकतो अथवा एखादी संस्था  ही मध्यस्थाची भूमिका  निभाव शकते यासाठी आपणास कोणतेही कष्ट लागणार नाही फक्त आपला मोबाईल हेच आपले साधन आहे मोबाईलच्या माध्यमातून आपणास आवश्यक असणाऱ्या शेतमालाची मागणी आपल्याला घरी बसून करता येईल यापूर्वीही अनेक मोठ्या कंपन्या हे काम करत होत्या तेच काम आपण करत  होत्या, आता फक्त आपण ते काम नी बनवायचे आहे तेही विनामोबदला यामुळे शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल व आपल्यालाही आनंद मिळेल आणि आपणास आवश्यक असणारा शेतमाल घरपोच मिळेल, सध्या COVID19  इफेक्टमुळे या मधल्या फळीला सध्या धक्के लागले आहेत याचा सर्वांनी कुठेतरी विचार करावा. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल थेट ग्राहकापर्यंत कसा पोहोच होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी थेट ग्राहकापर्यंत शेतमाल पोहोच केल्याने ग्राहकास तो स्वस्तात मिळेल व शेतकऱ्यांनाही चार पैसे वाढवून मिळतील ,यासाठी आवश्यक आहे नवीन संकल्पना. सध्या शेतकरी व इतर सुशिक्षित तरुणाकडे सध्या कामाचा तुटवडा आहे यातून सर्वांनी विचार करून एखादी संकल्पना राबवली तर शेतकरी सुखी झाल्याशिवाय राहणार नाही.
  उदा, शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकता येत नाही जसे की टरबूज कलिंगड द्राक्षे भाजीपाला यावरही आपणा सर्वांना उपाय शोधता येईल , आपल्या गावातील सर्व नागरिक मित्र, नातेवाईक असे मिळून एकत्र 25 किंवा 50 किलोची ऑर्डर असेल तर एखादा उत्पादक शेतकरी आपणास 25 ते 50 किलोची तुमच्या एरिया मध्ये शेतकरी स्वतः माल पोहोच करेल आणि त्याचा माल लवकर विकला जाईल,
 कृपया आशा प्रकारे नियोजन करून एकत्र ऑर्डर मिळाली तर त्या शेतकऱ्याला फायदा होईल,
 आपल्या भागातील बाजार समिती  अथवा एखाद्या सामाजिक संस्थेने आपल्या तालुक्यातील उत्पादक शेतकऱ्यांचे नाव, गाव ,मोबाईल नंबर, उत्पादन व त्याचा संपर्क क्रमांक द्यावा त्यास अपेक्षित असणारा भाव अशा प्रकारचे एखादे रजिस्टर जर तयार केले तर त्या तालुक्यामध्ये किती लोकांकडे कोणता  शेतमाल आहे, हे समजून येईल,तसेच  कोणत्या ग्राहकाचे मागणी आहे, किती मागणी आहे, किती स्वरूपात आहे ज्यांना आवश्यकता आहे ,अशा  ग्राहकाने  संबंधित  संस्थेकडे अथवा बाजार समितीकडे संपर्क केला असता ज्या व्यक्तीकडे दोन्ही माहिती आहेत त्यांना कळून चुकेल की कोणत्या व्यक्ती किती आवश्यक आहे? व तो शेतमाल कोणीकडे उपलब्ध आहे? यातून एका दिजेन सिस्टीम तयार करून तो मधला व्यक्ती अथवा संस्था सोमाल त्या ग्राहकापर्यंत पोहोच करू शकेल यातून सर्वांचे अर्थकारण चांगले चालेल.
 यातूनही अजून काही संकल्पना असतील तर मला अवश्य  कळवाव्यात.

फक्त  वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गोष्ट आहे. आपण सर्वांनी या बाबत विचार केला तर आपण  कोरोनावरही  मात करू शकतो व शेतकऱ्यांनाही न्याय देऊ शकतो असे मत सेनगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दत्तात्रय वाघ यांनी व्यक्त केले.

दत्तात्रय वाघ,सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती सेनगांव जि.हिंगोली 
संपर्क:- 7350532789

No comments:

Post a comment