तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 April 2020

मंगरूळपीर येथे मुक्या जनावरांसाठी पाण्याची सोय,युवकांचा पुढाकार
माणसांप्रमाणेच प्राणीमाञांच्या संवेदना ओळखुन सेवाभावी कार्य


वाशिम(फुलचंद भगत)-सध्या सर्वञ कोरोनामुळे हाहाकार ऊडाला असुन प्रशासनानेही संचारबंदी लावलेली आहेत अशातच गोरगरीबांचेही खान्यापिन्याचे वांदे होत असुन त्यासाठी शासनासोबतच सेवाभावी लोकही आपापल्या परिने गरीबांना मदत करत आहेत,असे असतांनि माञ मुक्या जीवांची पर्वा करन्यासाठी कुणाला वेळ मिळाला नाही.माणसांप्रमाणेच मुक्या जिवांच्याही संवेदना ओळखुन मंगरुळपीर येथील सामाजीक कार्यकर्ता प्रशांत गावंडे आणी त्यांचे मिञमंडळी एकञ येवुन जनावरांसाठी पान्याच्या टाक्या ठिकठिकाणी बसवुन पिन्यासाठी पाण्याचीही व्यवस्था केल्याने जनावरांना आता पाणी ऊपलब्ध झाल्याने या युवकांचे सर्वञ कौतुक होत आहे.
        तपत्या उन्हात आणि कोरोना या जीव घेण्या बिमारी मुळे सर्व लॉकडाउन परिस्थिती आली आहे.यामध्ये मुक्या जनावरचेही खुप हाल होत असून मंगरूळपीर मधील युवा त्यांच्या साठी समोर आलेत व शहरातील मुक्या जनावरांना पाण्याची सोय केली.लाॅकडाउनमुळे जनावरांनाही  पाणी मिळत नाही त्या अनुषंगाने शॉपिंग सेंटर,शिवरत्न चौक,बालाजी टॉकीज,आसरा माता मंदिर,वैष्णवी हॉटेल मनोली रोड येथे पान्याच्या टाक्या बसवुन जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली. पशु सेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीप्रमाणे हे युवक एकञ येवुन उपक्रम राबवला. यावेळी शिवा सोनोने,प्रशांत गावंडे, शुभम राऊत, गौरव इंगळे, राजेंद्र पिंपळकर, अक्षय काटकर, सचिन राऊत, वैभव हिवरकर, लक्ष्मण पाटील, कुणाल बुधे, व मित्र परिवार यांनी पुढाकार घेतला.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206/9763007835

No comments:

Post a comment