तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 8 April 2020

नितीन शिंदे यांना मातृशोक सुमनबाई संपतराव शिंदे यांचे निधन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
येथील पेठगल्ली भागातील सुमनबाई संपतराव शिंदे यांचे आज दि.07 एप्रिल रोजी संध्याकाळी 10 च्या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 66 वर्षांचे होते.
सुमनबाई संपतराव शिंदे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. पेठगल्ली भागातील नितीन शिंदे यांच्या त्या मातोश्री होत.  उद्या दि.8 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. सुमनबाई यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिंदे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात तेजन्युज परिवार सहभागी आहे.

No comments:

Post a comment