तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 April 2020

नोकरीवाल्यांनो,श्रिमंतांनो गावाच्या ॠणातुन मूक्त होण्याची हिच ती वेळ आहे......समाजात राहुन मोठे झालो पण समाजालाच विसरलो?

गावासाठी पुढाकार घेवुन गरजुंना मदत करन्याची गरज

फुलचंद भगत यांचा विषेश लेख

वाशिम(फुलचंद भगत)-गावात जन्मलो,वाढलो,मोठे झालो,मोठमोठी पदंही मिळवली,नोकर्‍या मिळवल्या,आज ऐषआरामात जीवन जगतोय पण त्या समाजात वावरलो मोठे झालो,ज्या गावाने सुखदुःखात साथ दिली,वेळप्रसंगी गावकरी धावून आलेत आज माञ गावातील गरिब लोकांवर कोरोनासारख्या महामारीमुळे  देशात लाॅॅकडाऊनमुळे जी ऊपासमारीची वेळ आली त्या वेळेत आपल्या प्रिय गावाला त्या गावकर्‍यांना साथ देन्यात आपण मागेपुढे का बघतो हे लाजीरवाने चिञ सध्या सर्वञ बघावयास मिळत आहे.ज्या मिञमंडळीच्या अंगाखाद्यावर आपण खेळलो पण परिस्थितीमुळे आर्थीक दुर्बल राहलेत त्याच खांद्याला हातभार लावन्यात लाज कसली वाटते रे धनधांडग्यांनो?असा आक्रोश ऐकावयास मिळत आहे."गाव करे ते राव ना करे" या ऊक्तीप्रमाने गावाला या संकटसमई सर्व हितचिंतक आर्थीक सुबत्ता असणारांनी थोडीफार मदत केली तर तुम्हाला कमी नाही होणार.मग का तुमचे हात गावच्या मदतीसाठी पुढे येत नाही?आपण पैसे कमविन्याच्या नादात आपल्या गावला का विसरतो,आपल्या समाजाला का विसरतो हे न उलगडणारे कोडे आहे.लाॅकडाउनमुळे सर्व कामधंदे बंद आहेत,हातालाच काम नाही मग पैसे येणार कुठुन,चुल पेटणार तरी कशी.सरकार आपल्या परिने गरजुंना मदत करत आहे पण सरकारच्या मदतीवरही का अवलंबुन राहावे,सरकार तरी कुठे कुठे लक्ष देणार त्यामुळे अशा परिस्थीतीत आपणच आपले रक्षक बनून आपल्या गावला दोन घास भरवन्याची आणी आपल्या मिळकतीतला काही हिस्सा गावच्या गरीबांसाठी खर्च करन्याची हिच ती वेळ.पण समाजाच्या भरवश्यावर नोकरी मिळवणारे ....शेपुट घालुन चिडिचिप दिसताहेत.पण काही दात्यांचीही कमी नाही.अशा संकटसमई परिस्थीतीची जान ठेवून सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त प्रा.नंदलाल पवार सारखे दातृत्व आपल्याला करता येईल का? ज्या नंदलाल पवार यांनी या लाॅकडाऊनच्या परिस्थीतीत आपल्या शेतातील आलेले गहु घरात न भरता गरीबांना वाटले,तेलमिट चटणी भाजीपाल्यासारख्या जिवनावश्यक गरजांसाठी आपले खिसे रिकामे केले,आपले जन्मगाव असणार्‍या चिखलागडातील सर्व गावकरांना मास्क संनिटायझर,साबण आणी जिवनावश्यक वस्तु आपल्या मुनिमजींच्या हाताने वाटप करुन साधा फोटोही न काढता,कुठेही प्रसिध्दी न देता गावहितासाठी आपल्या मिळकतीतुन लोकांना गावाला साथ तुम्हालाही देता येईल का?हा प्रश्न इथे प्रकर्षाने निर्माण होतांना दिसत आहे.प्रा.नंदलाल पवार हे एका लोकप्रीय दैनिकाचे प्रतिनीधी असुनही साधी बातमीही न देता अविरत गावासाठी,आपल्या मिञमंडळीसाठी आधिही आणी आताही मदतीचा हात देत आहेत कदाचित हे जिल्ह्यातील एकमेव ऊदाहरण असेल मग तुम्हीही या कठीण वेळैत गावसाठी काही करु शकणार नाहीत का?दिवाळी,गावची जञा आणी इतर महत्वाचे ऊत्सव आले की नोकरीवाले चेंज म्हणुन गावाकडे येतात.आपल्या गावचा अधिकारी म्हणून भोळेभाबडे लोकही आदराने नमस्कार चमत्कार घालतात,त्यांच्यापुढे नतमस्तक होतात,त्यांची सरबराही विचारपुस करतात.मग आता कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गावकर्‍यांवर ऊपासमारीची पाळी आली आहे त्यांना तुमच्या कनगीतही पायलीभर ज्वारी गहुही द्यायला हात का पुढे येत नाही हे खुप लाजीरवाने आहे.म्हणून नोकरीवाल्यांनो,श्रिमंतांनो आपल्या मिळकतीतला काही भाग अशा कठीण वेळेत गावासाठी खर्च करन्याची हिच वेळ आहे त्यामुळे ही संधी आतातरी गमावू नका हिच तुम्हाला विनंती.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a comment