तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 12 April 2020

देशावर कोरोनाच्या संकटात रेशनचा काळा बाजार करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा-रामराव गित्ते


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कोरोना विषाणूचा संसर्ग जगभर थैमान घालत आहे. या विषाणूचा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत देशावर मोठे संकट उभे राहिले असतांना बीड जिल्ह्यात मात्र गोरगरीबांच्या रेशनचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार करणाऱ्या दुकानदारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामराव गित्ते यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे ईमेल व्दारे केली आहे.
       देशभरात कोरोना विषाणूने हाहाकार घातला आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनामुळे लॉकडाऊनची स्थिती आहे. काही जीवनावश्यक गोष्टी सोडल्या तर बाकी सगळंच बंद आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हाच एक उपाय आहे. त्यामुळे देशात  दिवसासाठी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय देशाचे पंतप्रधानांनी घेतला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाॅकडाऊन आहे, हातावर पोट असणारे, रोजंदारी, कष्टकरी कामगार व गोरगरीब जनता यामुळे मोठ्या अडचणीत सापडली आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्य गोरगरीब जनतेला सरकारने रेशन दुकान मार्फत धान्य वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये कुटुंबातील सर्व रेशन कार्ड यांना गहू व तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातील(रेशन) धान्य वितरण फक्त ई पास मशीनद्वारे करण्यात येणार  आहे. कुटुंबातील ज्या व्यक्तींचा आधार क्रमांक पाॅस मशीनमध्ये वैधरित्या जमा केलेला आहे . अशा कोणत्याही एका व्यक्तीच्या हाताचे बोट वापरून आपले धान्य मिळवता येते.  आपल्या शिधापत्रिकेतील ज्या व्यक्तीचे नाव चुकले आहे किंवा ज्यांचे नाव समाविष्ट नाही आधार नंबर दिसत नाही अशा सर्व व्यक्तींचे आधार कार्डची झेरॉक्स संबंधित रेशन दुकानदार यांच्याकडे द्यावी. आणि दुरुस्ती करून घ्यावी या महिन्यामध्ये पुर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. दि.15 एप्रिल पर्यंत सर्व संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडे शिधापत्रिका धारकांची आधार कार्ड देण्यात यावेत.  सामान्य नागरिकांना शिधापत्रिकेवर रेशन मिळणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुकानदारांकडून हेळसांड होत आहे. तर काही दुकानदार रेशनकार्ड धारकांची पिळवणूक करीत आहेत. काही ठिकाणी तर पावती देण्यासाठी टाळाटाळ होते. अशा दुकानदारावर कारवाई करण्यात यावी. तसेच रेशनकार्ड धारकांना मोफत प्रति व्यक्ती पाच  किलो प्रमाणे तांदूळ आणि दोन रुपये किलोप्रमाणे गहू व तीन रुपये प्रति किलो प्रमाणे तांदूळ देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी दुकानदारावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला न जुमानता गोरगरीबांची पिळवणूक करीत आहेत. आता वेळ आलेली आहे. प्रशासानाने कडक कारवाई  दाखवायची  आपल्या प्रशासनात काय चाललेला आहे  ज्याला धान्य मिळत नाही  जो धान्यापासून वंचित आहे  ज्याच्याकडे रेशन कार्ड  असूनही  त्याला धान्य मिळत नाही  शासनाच्या अन्न सुरक्षेचा लाभार्थी आहे  त्याला धान्य मिळतं पण कमी मिळतं  व पावती मिळत नाही   आणि ज्याच्याकडे  रेशनिंग कार्ड आहे. हीच वेळ आहे  रेशनिंगचा काळाबाजार   सरकार समोर आणून सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याची.  जिल्ह्यातील काही स्वस्त धान्य दुकानदार दुकान उघडत नाही, धान्य नियमाप्रमाणे न देता कमी प्रमाणात देतात, ई-पोस मशीनची पावती देत नाही, शासनमान्य रकमेपेक्षा जास्त रक्कम घेतात, धान्य देत नाही, ग्राहकांची अडवणूक करतात, ग्राहांकासह अरेरावीची भाषा वापरतात अशांवर प्रशासनाने चोप दिला पाहिजे.  लॉकडाऊनमुळे हजारो लोकांवर उपासमारीचे संकट आहे सरकार कडून मोफत धान्य वाटपाची घोषणा केली परंतु रेशन दुकानदारांनी गोरगरीबांच्या तोडातला घास काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात आहेत. परळीचे उपजिल्हाधिकारी परळीत काळा बाजारात जाणाऱ्या ट्रँकटरवर कारवाई करून जप्त केले आहे. तसेच गोडाऊन पण सिल केले आहे. जिल्ह्यात व तालुक्यात रेशनचा किती धान्य पुरवठा होत हे पण गुलदस्त्यात आहे. त्याची माहिती देण्यात यावी. संकटकाळी अशा परिस्थितीत राजकारण्यांचा वरदहास्त असणाऱ्या पुढाऱ्यांनी धाडस केले कसे अशांवर कडक शासन करावे, गोरगरीब, मजुर यांच्या धान्य पळविणाचा प्रकार कुठे घडत असेलतर 8805444999 या नंबर फोन. किंवा व्हटसहप मँसेज करावा, देशावर कोरोनाचे महाभयंकर संकट उद्भवलेले असतांना रेशनचा काळा बाजार करणाऱ्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामराव गित्ते यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री यांच्या सह उपमुख्यमंत्री, मंत्री अन्य नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, विरोधी पक्षनेते विधानसभा, विधान परिषद, विभागीय आयुक्त औरंगाबाद, सचिव, महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी बीड यांना ईमेल व्दारे देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a comment