तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 April 2020

सरपंच राजाभाऊ फड यांच्या पुढाकाराने कन्हेरवाडी येथील ग्रामस्थांची वन रूपी क्लीनिकच्या माध्यमातून आरोग्य तपासणीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी येथील ग्रामस्थांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वन रुपी क्लीनिक टीमच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करण्यात आली. यासाठी सरपंच राजाभाऊ फड यांनी पुढाकार घेऊन तपासणी करण्यात आली.
         कोरोनाच्या विषाणुचा जगभर हाहाकार माजला असून याच पार्श्वभूमीवर कुठलाही प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वन रुपी क्लीनिक टीम कन्हेरवाडी येथे तपासणी करण्यात आली. आत्तापर्यंत वन रुपी क्लीनिक टीम ने वरळी मध्ये 9710, लोअर परेल मध्ये 8000
कुर्ला वेस्ट मध्ये N.C.P. चे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक
यांच्या उपस्थितीत कुर्ल्यातील रहिवाशांसाठी अवघ्या एक रुपयांमध्ये विलाज करणारे वन रुपी क्लीनिक चालू करण्यात आले आणि तेथील 10000 स्थानिक लोकांची घरोघरी जाऊन स्क्रीनिंग टेस्ट करण्यात आली 
कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वतःच्या ट्विटर अकाउंट वरून वन रुपी क्लीनिक ची स्तुती करत वन रुपी क्लीनिक च्या सर्व टीमचे मनोबल वाढवले शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन व वन रुपी क्लीनिक यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस व पत्रकारांसाठी फिरता दवाखाना ही मोहीम हातामध्ये घेतली देशासाठी अनमोल असे योगदान देणाऱ्या सर्वांचेच मनोबल वाढवले.
सध्या कोरोना या आजाराने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे याचा प्रादुर्भाव पाहून ग्रामीण भागातील कामगार, ऊसतोड मजूर, यांनी आपापल्या गावाकडे घरवापसी केली आहे.
हीच बाब लक्षात घेता कनेरवाडी गावचे सरपंच राजाभाऊ फड व चेअरमन श्रीराम मुंडे यांनी वन रुपी  क्लिनिक चे संस्थापक डॉ. राहुल घुले यांच्याशी संपर्क साधला व गाव हितासाठी गावा बाहेरून आलेल्या सर्व नागरिकांची घरोघरी जाऊन मोफत स्क्रीनिंग टेस्ट करण्यात आली व त्यांना योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला.

No comments:

Post a comment