तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 April 2020

सेनगाव तालुक्यातील जामठी येथील अल्पभूधारक शेतकरी यांचा दीड एकर ऊस जळून खाकसाखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

एमेसिबी च्या हलगर्जीपणामुळे जामठी येथील शेतकरी बबन गुलाबराव सरनाईक या शेतकऱ्याचा एकूण दीड एकरातील ऊस जळून गेला आहे काल सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांच्या शेतामध्ये असलेली लाईट खाब्यावरील तार जोराची हवा सुटल्यामुळे एकूण एकाला टच झाल्यामुळे फॉल्ट होऊन विजेचे गोळे खाली पडल्यामुळे खाली असलेल्या ऊसाला आग लागली त्यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे तरी शासनाने याची तात्काळ दखल घेऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे जर शासनाकडून नुकसान भरपाई नाही मिळाली तर माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल असे सुद्धा शेतकऱ्यांनी म्हटले आहे वर्षभर मेहनत करून हाती आलेले पीक पूर्णत्वास जळून खाक झाले आहे तरी अशा शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून द्यावी ही शासनाकडे विनंती आहे


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment