तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 April 2020

गेवराईत नियम मोडणाऱ्यांवर कारवाई - मुख्याधिकारी बिघोतसुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. १४ _ येथील नगर परिषदेच्या वतीने आठ पथके तयार करण्यात आली असून, नियम मोडणाऱ्या व्यापारी व नागरिकांना आता कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याची माहिती नगर परिषदचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी दिली आहे.
        मंगळवार, दि. १४ रोजी सकाळी अकरा वाजता नगर परिषद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शहरातील लाॅकडाऊन कडक करून, मोफत मास्कचे वाटप व अन्य महत्वाचे विषयावर चर्चा झाली. यावेळी नगराध्यक्ष सुशिल जवंजाळ, उपाध्यक्ष राजेंद्र राक्षसभूवनकर, डाॅ. राजेश शिंदे, डाॅ. नोमाणी महमंद, संजय आंधळे, डाॅ. आंधळे, बाळानाथ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष पोफळे, रखमाजी चौधरी व न. प. चे कर्मचारी उपस्थिती होते. घराबाहेर येणाऱ्या नागरीकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी नगर परिषदेच्या वतीने आठ पथके तयार करण्यात आली असून, नियम भंग करणाऱ्या नागरिकांना कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याची माहिती नगर परिषदचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी दिली आहे. कोरोना सारख्या आजाराला रोखण्यासाठी सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करून, नागरीकांनी घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडायचे आहे. तोंडाला मास्क वापरून, सार्वजनिक ठिकाणी खोकताना, शिंकताना नाकावर स्कार्फ किंवा मास्क लावायचा आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरूद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे, नागरीकांनी नियम पाळावेत असे आवाहन नगर परिषदचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी केले असल्याचे आमचे पत्रकार सुभाष मुळे यांनी सांगितले आहे. 
         दरम्यान, कोरोना सारख्या आजाराला रोखण्यासाठी शहरातील नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंग पाळणे आवश्यक आहे. गरज पडल्यास मास्क वापरून घराबाहेर पडा, असे आवाहन आमदार लक्ष्मणराव पवार यांनी येथे बोलताना केले.

------------
@ सुभाष मुळे, पत्रकार
मो. 94 2224 3787

No comments:

Post a comment