तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 23 April 2020

इसापूर धरणाचे पाणी दोन टप्यात पैनगंगा नदी पात्रात सोडण्यात यावे-खासदार हेमंत पाटील(विश्वनाथ देशमुख सेनगावकर)

हिंगोली : शेती व पिण्यासाठी यंदाच्या हंगामात इसापूर धरणाचे पाणी दोन टप्यामध्ये पैनगंगा नदी पात्रात सोडण्यात यावे अशी मागणी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे .
       विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पैनगंगा नदीवर असलेल्या इसापूर धरणाने  समृद्ध केले आहे .  नांदेड, हिंगोली, इतर भाग या धरणामुळे सुजलाम सुफलाम झाला आहे .हिंगोली लोकसभा मतदार संघातील कळमनुरी, उमरखेड ,हदगाव हिमायतनगर,या भागातील जनतेला व शेतीला पाणीपुरवठा होत असतो.तसेच कळमनुरी ,उमरखेड शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या पाण्यावर अवलंबून आहे . यंदाच्या कोरोनाच्या संकटामुळे सगळीकडे हाहाकार उडाला असून जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला यामुळे यंदाच्या हंगामात सर्व सामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन इसापूर धरणातून येत्या 25 एप्रिल दरम्यान आणि पुढील महिन्यात 15 मे नंतर पाण्याच्या दोन पाळ्या सोडण्यात याव्यात  असे खासदार हेमंत पाटील नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे .
हिमायतनगर  तालुक्यातील पैनगंगा नदी काठच्या गावाची नळ योजना ऐन उन्हाळ्याच्या सुरवातीलाच बंद पडली असून आणि उमरखेड , किनवट , कळमनुरी भागातील शेती व पिण्याच्या पाण्याची समस्या नागरिकांनी खासदार हेमंत पाटील यांच्याकडे मांडली होती.कोरोना मूळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात सर्व सामान्य जनतेचे अतोनात हाल होत असून  खासदार हेमंत पाटील  मात्र सतत जनतेच्या संपर्कात आहेत .अनेक सामाजिक उपक्रम राबवत आपले कर्तव्य पार पाडत थेट जनतेशी सवांद साधत आहेत.

No comments:

Post a comment