तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 10 April 2020

मा.फुलेंच्या विचारांची क्रांतिकारी परंपरा जतन करा.

...........................
आज आपण सर्व जन जी प्रगती करून जगातील सर्व ठिकाणी जाऊन भारतीय आपल्या बौद्धिक क्षमता वापरत आहोत त्याचे सर्व श्रेय मा.जोतीराव फुलेंना जाते.जोतिबांचा जन्म ११एप्रिल १८२७ साली झाला आणि भारतात एका क्रांतीपर्वाला सुरुवात झाली . बहुजन समाजातील रंजले गांजलेल्या गरीबांना त्यांच्या मुक्तीची द्वारे खुली करून शोषणमुक्त समाजाच्या मुक्ती लढयाची मुहूर्त मेढ भारतात रोवली . आज महाराष्ट्र राज्याला जी पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळख मीळाली त्याची मुळ महात्मा जोतीराव फुलेंच्या कर्तृत्वात आहे. संपूर्ण समाज शिकल्या शिवाय मानवाच्या शोषणाचा निपात करणे अशक्य आहे हे ओळखून त्यांनी सावित्रीबाईंंना शिक्षण देऊन मुलींसाठीची देशातील  पहीली शाळा काढली.ज्या सनातन कर्मठ धर्माच्या चालीरीतींनी  महीलांंच्या अविरत शोषनासाठी त्यांंना शिक्षण नाकारले होते त्या धर्माची चिकित्सा करणारे अधुनिक भारतातील मा.जोतिबा फुले हे पहीले धर्मचिकीत्सक क्रांतिकारक आहेत. एका बाजूला अस्पृश्यता निवारण आणि महीलांंना शिक्षणाचा हक्क मिळवून देऊन धार्मिक शोषणाच्या विरुद्ध बंड छेडतात म्हणून फुलेंचा फक्त समाज सुधारक म्हणून उल्लेख करणे अर्धवट ठरते ते तर फक्त
 कर्ते सुधारक नसुन क्रांतिकारक ठरतात. याच काळात फुले जेव्हा सनातनत्व नाकारुन जेकारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले या संत वचनाप्रमाने दलित समाजासाठी आपला पिण्याच्या पाण्याचा हौद खुला करतात तेव्हा भारतीयांच हिंदुत्व हे मनुच्या मनुस्मृतीवर आधारित नसुन ते संत तुकारामांच्या भागवत धर्माच्या समानतेवर आधारित आहे म्हणूनच पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीतले लोक आजही एकमेकांच्या पायापडून ऊच्च निचता नाकारता. तो खरा हिंदू धर्म आहे हे समजून घ्यायला मा.फुलेंची ग्रंथ संपदा आत्मसात केली पाहीजे. कारण त्यांनीही चातुरवर्ण व्यवस्था नाकारलीच नाही तर ती कसे शोषण करते असे सांगुन बहुजन समाजाच्या शोषण मुक्तीची चळवळ उभी केली. छत्रपती शिवरायांची समाधी शोधून छत्रपती शिवराय हे कुळवाडी भुषण म्हणजे  शेतकऱ्यांचे रयतेचे राजे आहेत हा इतिहास समोर आणला व शिवरायांना गुरू मानुन शिवरायांचा वारसा पुढे चालवला तोच वसा सावित्रीबाई  व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्विकारला ते फुलेंना वैचारिक गुरु मानतात व पुढे फुले शाहु आंबेडकरांची पुरोगामी विचारांची परंपरा भारतीय विचारांची पुरोगामी परंपरा म्हणून विकसित होतांना लाखो अनुयायी मिळवते व संबंध जगात मानवमुक्तीच्या लढयाशी नात जोडते. भारतात जेव्हा फुले धर्माच्या कर्मठपणाला आवाहन देतात तेव्हा जर्मनीचा कार्ल मार्क्स धर्म ही अफुची गोळी आहे असे विधान करतो पुढे जेव्हा जागतिक अभ्यासक फुलेंचा अभ्यास करतात तेव्हा त्यांना भारतातील  मार्क्स म्हणतात. व फुलेेंचे विचार जागतिक शोषण मुक्तीच्या लढाईत भारतीय वैचारीक परंपरेचा कायमचा ठसा सोडतात.
महाराष्ट्राचा पुरोगामी वारसा जागतिक होतो. पुरोगामीत्व हे महाराष्ट्राला संत तुकाराम ज्ञानेश्वर एकनाथ,  साई ,  गाडगेबाबां ही संत परंपरा तर छत्रपती शिवराय  छत्रपती संभाजी महाराज, मा.फुले घत्रपती शाहू महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,शहीद राजगुरू आणि आज अलिकडे शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कार्याचा व विचारांचा पराक्रमी वैचारीक व वैज्ञानिक वसा आहे. तेव्हा पुरोगामी या शब्दाचा द्वेष करणारे महाभाग हे ही परंपरा नाकारुन मनुची सनातनी परंपरा जनतेच्या माथी  मारण्याच्या उचापती सातत्याने करतांना दिसतात. त्याला सामान्य बुद्धीमता असलेले लोक तरुणही बळी पडतात.म्हणून आपली बौद्धिक  क्षमता विकसित करण्यासाठी म.फुलेंच्या समतावादी विचार समजून घेणे आवश्यक आहे आपण ते कराल हेच फुलेंंना जयंती प्रसंगी क्रांतिकारी अभिवादन ठरेल.नसता आयटीसेल दिमाखाचे पाकिट मारण्यासाठी आहेच त्यांच्या पोस्ट फॉरवर्ड करत रहाण्यातच आयुष्य खर्ची होईल म्हणून   फुलेंची  परंपरा असलेली पुस्तके वाचा सत्य आत्मसात करा आपणास व आपल्या कुटुंबाला मा.जोतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
आपला
डॉ. भाऊसाहेब झिरपे
औरंगाबाद.

No comments:

Post a comment