तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 26 April 2020

मांडवजाळी भिल्ल वस्तीच्या धरती वर बीड जिल्ह्यातील इतर पालांवर मदत करावी , आष्टी, पाटोदा, शिरूर ,माजलगाव, गेवराई,केज येथील लोकांना मदतीची गरज ; पालकमंत्र्यांनी पालकत्व सिद्ध केलेबीड (प्रतिनिधी) :-  कोरोना विषाणूचा संपूर्ण महाराष्ट्र  बंद आहे. या बंदच्या काळात अनेक मदतीच्या घोषणा झाल्या काही लोकां पर्यंत मदत मिळाली काहीना आद्याप मिळालेली नाही. गावकुसा बाहेर राहणारी भिल्ल, पारधी, आदिवासी, मसणजोगी वैदू, गोपाल, नंदीवाले, डोंबारी, गोसावी, डावरी नाथपंथी, या भटक्या जातींना उपासमारीची वेळ आली आहे. पिण्यासाठी पाणी नाही,राहायला घर नाही, हाताला काम नाही, गावा मध्ये फिरायला भिक्शा बंदी आहे, भिक्षा मागता येत नाही. लाॅकडाऊन मुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्यावेळी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले प्रिंट मीडियातून बातम्या आल्या त्यानंतर मदतीला सुरुवात झाली त्यामध्ये बीड चे पालकमंत्री तथा समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे व बीड समाज कल्याण उपायुक्त सचिन मडावी यांनी हाती सूत्र घेत या भिल्ल वस्ती मध्ये पाण्याची व धान्याची व्यवस्था केली, त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांचे पालकत्व पालकमंत्री म्हणून सिद्ध झाले आहे, त्यांनी इतरही वस्त्या कडे लक्ष देऊन मदत कार्य करणे आवश्यक आहे.

मांडवजाळी भिल्ल वस्तीवर  पालकमंत्री आणि प्रशासनाने लक्ष घालून तात्काळ दखल घेऊन मदत केली आहे. त्याच पद्धतीने इतर पालावर,वस्त्यावर  देखील अन्नधान्याची मदत तात्काळ आवश्यक आहे.  
लाॅकडाऊन मुळे परिस्थिती खुप गंभिर झाली आहे. पाला वरील, वस्तीवरील लोकांचं जगणं सुसह्य झाले आहे, डोंगर दर्या मधील वस्ती,पालावर लोक  कोरोना विषाणू मुळे कमी मरतील, पण भुकेने जास्त  भुकबळी पडतील अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

शिवनी भिल्ल वस्ती, वांगी भिल्ल वस्ती,धानोरा भिल्ल वस्ती, खजाना विहिर भिल्ल वस्ती, पांगर बावडी मसणजोगी वस्ती, साखरे बोरगाव पारधी वस्ती येळंबघाट पारधी वस्ती, पाचांग्री पारधी वस्ती, केज तालुक्यातील वेगवेगळ्या वस्त्या आहेत, आष्टी तालुक्यातील, आहेर वाहेगाव पारधी वस्ती, नागपूर, उमरी भिल्ल वस्ती, शिरूर भिल्ल पारधी वस्ती, नांदुरघाट भिल्ल कोरेगाव पारधी वस्ती, चिंचोली माळी वस्ती, एकुरका पारधी वस्ती, युसुफ वडगाव गायरान पारधी वस्ती, धनेगाव पारधी वस्ती, सोनिमोहा पारधी वस्ती, सोनिजवळा पारधी वस्ती, वस्ती, साळेगाव पारधी वस्ती, हनुमंत पिंपरि पारधी वस्ती, केवढे पारधी वस्ती,केज शहरा लगत 50 पारध्यांची लोकवस्ती आहे. या बीड जिल्ह्यातील प्रमुख वस्ती आहेत ज्या ठिकाणी पालकमंत्री व प्रशासनाने तात्काळ दखल घेणे गरजेचे आहे.
बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या खेड्याच्या बाजूला वस्ती करून राहणारा हा समाज भिल्ल,पारधी,मसनजोगी,वैदू,नंदी वाले,माकडवाले, गोसावी,डावरी नागपंथी, डोंबारी,समाज विखुरलेल्या अवस्थेत आहे. त्यांना मदत शासन स्तरावर आन्न धान्याची  व पाण्याची  खुप गरजेचे आहे.


मदत ग्रुप व बीड पोस्टल क्रेडिट सोसायटी यांनी हाती घेतलेलं हे मदत कार्य लाॅकडाऊन च्या परिस्थिती मध्ये खूप महत्त्वाचा ठरला आहे, यांच्या मदत कार्याची दखल घेऊन वृत्तपत्रातून बातम्या प्रकाशित झाल्या राजेश शिंदे व टीम अमरसिंह ढाका व  टीम यांच्या कार्याची प्रेरणा बीड जिल्ह्यातील इतर मदत करणाऱ्या,नेता, संस्था मंडळे यांनी घेण्याची गरज आहे.

No comments:

Post a comment