तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 26 April 2020

कोरोनाच्या संकटात पत्रकार बांधवांनी बातमी संकलन करतांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी ; अजित देशमुख यांनी पञकारांची आस्थेवाईकपणे विचारपुस


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- जगात कोरोना विषाणुमुळे नागरिक हैराण झाले आहेत. देशात व राज्यात कोवीड-19 म्हणजेच या विषाणूमुळे सध्या समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संकटात आहोरात्र काम करणारे पत्रकार बांधवांनी बातमी ग्राऊंडवर जाऊन संकलन करतांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच परळी शहरातील पञकार जिवाची पर्वा न करतात काम करीत आहेत.  या कालावधीत पञकाराची  कोणीच दखल घेतली नाही माञ परळी शहरातील एका उद्योगपती यांचा मुलाने माञ मध्य राञी व्हटसहँपवर मॅसेज टाकून पञकर व कुटूबांची आस्थेवाईकपणे विचारपुस केल्याने त्यांचे परळीतील अजित दिलीपराव देशमुख (बेलंबेकर) यांनी केले आहे. 
    जगात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात लागू असलेले लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणं धोक्याचे बनलं आहे. कोरोना ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गोरगरीब नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाच्या संकटाचा सामना प्रत्येकजण जबाबदारी निहाय करीत आहे. अशा कठीण परिस्थितीत जिवाचे परवा न करता पत्रकार बांधव आहोरात्र सेवा करीत आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार हे पण कोरोनाच्या लढाईत जिवाची परवा न करता ग्राऊंडवर जाऊन बातमी तयार करतात व ती बातमी आपल्या पर्यंत पोहोंचती करतात त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. कोरोना युद्धाची प्रत्येक घटना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार बांधवांकडून होत आहे. सरकार आणि जनतेमधला महत्त्वाचा दुवा म्हणूनही ते काम करत आहेत. हे काम करताना अनेक पत्रकार बांधवांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पत्रकार बांधवांनाही सरकारकडून संरक्षण मिळण्याची आवश्यकता आहे. कोरोनाच्या लढाईत उत्कृष्ट कामगिरी पत्रकार बांधव करीत आहेत. त्यांच्या पुढे अनेक प्रश्न निर्माण झाले असतांनाही ते काम चांगल्या प्रकारे हाताळीत आहेत. कोरोना संकटकाळात उत्तम कामगिरी करणाऱ्यांना त्या मंडळीमध्ये हे पण आहेत. कोरोना व्हाँयरसने धुमाकुळ घातला असुन सर्वत्र लाँकडाऊन आहे.अशा परिस्थितीत परळी शहर व तालुक्याची कोरोनाला हरवायच्या  लढाईचे वार्ताकंन करणे सोपी गोष्ट नाही मात्र जिवाची पर्वा न करता हा जनसेवेचा वसा पत्रकार बांधव करीत आहेत. पत्रकार बांधव यांनी आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी. असा मँसेज व्हटसहँप वरू टाकून आस्थेवाईकपणे विचारपूस करून आपल्या काळजी घ्यावी असे सांगितले. पत्रकार बांधव कोरोनाच्या संकटात जिवाचे पर्वा न करता आपले काम करीत आहेत.
 सर्व प्रिय पत्रकार बांधवांचा(साहेब,काका) माझा नमस्कार ....🙏🏻 आपण कशे आहात आणि घरी सगळे चांगले आहेत ना?? चांगले च असतील आपण सर्वे जन जे काम करता आमच्या सर्वांची काळजी घेतात संमपुर्न जग,देश व राज्या ची घडामोडी आमच्या पर्यंत पोचोतात  ह्या अशा भयंकर कोरोना (COVID-19)पसरलेले बिमारी मध्ये खरच आपल्या कामाला पन सलाम ........... डाॅक्टर,पोलिस आदि हे पन राबतात त्यांनाही सलामच .
पन आपण लोक पन कमी नाहित.माझ्या मनांत आठवण आली न लगेज आपल्याला संदेश लिहीला.मला माहित नाही आपण वाचताल का नाही पण कोरोना झाला की एकदा तरी आपण सर्व पत्रकार बांधवांना आमंत्रित करनार. आपण आपली आणि परिवाराची काळजी घ्या हिच आपल्या सर्वांना मनापासून विन्नति आहे.
आपण सर्वे ह्या कोरोना ला नक्कीच मात देऊन पुढे जाऊ.. आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कोणी दखल घेतली नाही. परंतु पंचेवीस वर्षीय तरूणांने आस्थेवाईकपणे विचारपूस करून कौतुक केले आहे. तसेच पत्रकार बांधवांनी आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन गोविंद समुहाचे तसेच परळीतील उद्योजक अजित दिलीपराव देशमुख (बेलंबकर) यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment