तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 8 April 2020

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी :- पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे


· पालकमंत्री यांनी घेतला चिखली येथील परिस्थितीचा आढावा

बुलडाणा, दि. 8 :

देशभर हैदोस घालणाऱ्या कोरोनाने  जिल्ह्यात देखील चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील 6 तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. बुलडाणा आणि चिखली शहरात तर रुग्ण संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी शासनाच्या सुचनांचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर कुणीही पडू नये. पोलीस प्रशासनासने संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.
     पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज चिखली येथील मुकूल वासनिक सांस्कृतिक भवन येथे अधिकाऱ्यांची व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आमदार श्वेताताई महाले, मुख्याधिकारी अभिजित वायकोस, पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ, नायब तहसीलदार निकेतन वाळे, बीडीओ सुरेश कांबळे,  ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ खान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ इम्रान खान, डॉ. वायाळ, डॉ अमोल राजपूत आदी उपस्थित होते.
 ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांनी सुरक्षीततेची काळजी घेण्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, कोरेानाचा प्रादुर्भाव्‍ रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. काम करत असतांना अधिकाऱ्यांना काही अडचणी येत असतील तर त्यांनी त्या देखील मनमोकळेपणाने सांगाव्यात.  संचारबंदीच्या काळात संचारबंदीचे उल्लंघन करणारा लहान असो की मोठा त्यावर कडक कारवाई करावी,  असे आदेशही त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले.
  चिखली शहरातील परिस्थिती हाताळत असतांना येथील निर्णय घेण्याचे अधिकार नगर परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले. ग्रामीण भागात नेमक्या काय उपाययोजना करण्यात येत आहे, याची माहिती घेऊन शेतकऱ्यांना शेतीचे काम करतांना कुठलाही त्रास होणार नाही, याबाबत काळजी सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी महत्वपूर्ण सूचना देखील पालकमंत्री यांनी अधिकाऱ्यांना केली.
  यावेळी पालकमंत्री यांनी ग्राउंड स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्याबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. बैठकीमध्ये सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करण्यात आले.


                                                                        जमील पठाण
8805381333  8804935111

No comments:

Post a Comment